Wednesday, July 3, 2024

‘या’ व्यक्तीने आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाला म्हटले ‘सॉफ्ट पॉर्न फिल्म’, काय असेल अभिनेत्याची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) एक प्रतिभावान व्यक्तिमत्त्व आहे. त्याचे चित्रपट अनेकदा समाजाला संदेश देतात. त्याचा प्रत्येक चित्रपट काही ना काही रुढीवादी परंपरा तोडतो. पण अलीकडेच एका व्यक्तीने त्याच्या चित्रपटाबद्दल दावा केला आहे की, त्याचा आगामी चित्रपट सॉफ्ट पॉर्नशिवाय काहीच नाहीये. त्यामुळे आता आयुष्मानचे अनेक चाहते नाराज झाले आहेत. 

केआरकेचे ट्वीट व्हायरल
केआरके उर्फ ​​कमाल आर खान (Kamaal R Khan) हा बॉलिवूडमधील वादग्रस्त सेलिब्रिटींपैकी एक आहे. तो अनेकदा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याचे अंदाज बांधत असतो. यावेळीही त्याने तेच केले आहे. खरं तर, केआरकेने आपल्या ट्वीटमध्ये आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर (Vaani Kapoor) अभिनित ‘चंडीगढ करे आशिकी’चे वर्णन ‘सॉफ्ट पॉर्न फिल्म’ असे केले आहे. (krk told ayushmann khurrana upcoming film a soft porn)

केआरकेने शेअर केला पोल
‘चंदीगढ करे आशिकी’ हा चित्रपट एलबीजीटीक्यू (LGBTQ) समुदायाच्या थीमशी संबंधित आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आयुष्मान खुराना आणि वाणी कपूरचे काही बोल्ड सीन्स दाखवण्यात आले आहेत. यानंतरच केआरकेने याला ‘सॉफ्ट पॉर्न फिल्म’ म्हटले आहे. केआरकेने ट्विटर पोल करून चित्रपटाला ट्रोल केले आहे. त्याने लिहिले, “तुम्ही ‘चंदीगढ करे आशिकी’ ही सॉफ्ट पॉर्न फिल्म थिएटरमध्ये पाहाल का?”

चित्रपटाला केले ट्रोल
इतकेच नाही तर केआरकेने पोलचा निकाल दाखवत चित्रपटाला ट्रोलही केले. या पोलमध्ये ३५ टक्के युजर्सने चित्रपटगृहांमध्ये ‘चंदीगढ करे आशिकी’ पाहणार असल्याचे सांगितले. याबद्दल ट्वीट करत केआरकेने लिहिले की, “सर्वेक्षण निकाल – ३५% हताश आणि फालतू लोकांना ‘सॉफ्ट पॉर्न फिल्म’ ‘चंदीगड करे आशिकी’ पाहायची आहे. म्हणजेच पहिल्याच दिवशी ३ ते ४ कोटींचा व्यवसाय करण्यात चित्रपट यशस्वी होणार आहे. चित्रपटाचे बजेट जवळपास ७० कोटी आहे!”

‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीझ
आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर अभिनित ‘चंदीगढ करे आशिकी’ १० डिसेंबरला रिलीझ होत आहे. अभिषेक कपूरने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अलीकडेच त्याने खुलासा केला की, चित्रपटाचे शीर्षक इतर कोणी नाही तर आयुष्मान खुरानाने सुचवले होते. या चित्रपटाद्वारे आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर ही जोडी पहिल्यांदाच ऑनस्क्रीन दिसणार आहे. या चित्रपटापूर्वी वाणी कपूर अक्षय कुमारसोबत ‘बेल बॉटम’मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती.

हेही नक्की वाचा –

हे देखील वाचा