आयुष्मानचा स्वॅगच भन्नाट! परिधान केले समुद्रातील कचऱ्यापासून बनलेले जॅकेट, किंमत आहे…


कलाकार आणि फॅशन यांचं वेगळंच नातं आहे. कलाकार म्हणलं की फॅशन आल्यावाचून राहतच नाही. सध्याच्या घडीला आपल्याला अनेक प्रकारचे फॅशन सेन्स असलेले कलाकार पाहायला मिळतात. यामध्ये अधिकतर तुम्ही अभिनेत्रींना पाहिले असेल, पण बॉलिवूडचे कलाकारही मागे नाहीत. एकापाठोपाठ एक हिट चित्रपट देऊन प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता आयुष्मान खुरानाचा यामध्ये समावेश आहे. सध्या तो आपल्या फॅशन सेन्समुळे चर्चेत आहे.

आयुष्मानचा आगामी ‘चंदीगड करे आशिकी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. आयुष्मान सध्या आपल्या याच चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच एका प्रमोशनल इव्हेंटदरम्यान आयुष्मान एका सुपर स्टायलिश सोनेरी आणि चंदेरी रंगाच्या बॉम्बर जॅकेटमध्ये दिसला. (Actor Ayushmann Khurrana Look Handsome In Bomber Jacket Made Up of Ocean Waste)

आयुष्मानचा डिस्को लूक जॅकेट पाहून चाहतेही इम्प्रेस झाले आहेत. तसेच, ते अभिनेत्याच्या लूक आणि आऊटफिटचेही दीवाने झाले आहेत.

आयुष्मानचे सोनेरी आणि चंदेरी बॉम्बर जॅकेट डिझायनर गौरव गुप्ताचे आहे. मात्र, हे सामान्य जॅकेट नाही. हे जॅकेट EcoKaari ने बनवले आहे. या जॅकेटचे फॅब्रिक प्लॅस्टिक रॅपर्स, बाटल्या आणि बायोडिग्रेडेबल उत्पादने यांसारखा समुद्रातील कचरा वापरून बनवले आहे.

आयुष्मानने आपले जॅकेट पांढरा टी-शर्ट, पांढरी पँट आणि पांढर्‍या स्नीकर्ससह पूर्ण केले आहे. आयुष्मान प्रत्येक फोटोमध्ये वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. लोक अभिनेत्याच्या जॅकेटचे चाहते होत आहेत आणि त्याच्या लूकचे कौतुक करत आहेत.

जर तुम्हाला आयुष्मान खुरानाचे हे जॅकेट तुमच्या कलेक्शनमध्ये जोडायचे असेल, तर तुम्ही ते डिझायनर गौरव गुप्ताच्या वेबसाईटवरून खरेदी करू शकता. वेबसाईटवर या जॅकेटची किंमत ६० हजार रुपये इतकी आहे.

आयुष्मानच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर त्याने सन २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्याने अनेक हिट चित्रपटात काम केले. यामध्ये ‘बाला’, ‘बधाई हो’, ‘आर्टिकल १५’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लाल टिकली, नाकात नथ अन् बोटात मोठी अंगठी घालून रुपालीच्या झक्कास पोझ, पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

-मीनाक्षी शेषाद्रींनी वाढदिवसानिमित्त फोटो केला शेअर, वयाच्या ५८ व्या वर्षीही दिसतात खूपच सुंदर

-‘राम सेतू’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला आली आईची आठवण, व्हिडिओ पाहून तुमचेही पाणावतील डोळे


Latest Post

error: Content is protected !!