कमाल राशीद खान (Kamal Rashid Khan) उर्फ केआरके चित्रपटांपेक्षा त्याच्या ट्विटसाठी ओळखला जातो. तो अनेकदा ट्विटरवर काहीतरी लिहितो, ज्यामुळे तो चर्चेत येतो. अलीकडेच, त्याने आमिर खान (Aamir Khan) आणि शाहरुख खानबद्दल (Shahrukh Khan) असे काही सांगितले की त्याचे ट्विट पाहताच व्हायरल झाले. या पोस्टमध्ये त्यांनी दोन्ही सुपरस्टार्सवर जोरदार निशाणा साधला आहे.
केआरके अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आमिर खानच्या ,’लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटावर निशाणा साधत आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी एका नव्या ट्विटमध्ये आमिरच्या चित्रपटाला अपयशी ठरवले आहे. आपल्या ट्विटमध्ये केआरकेने आमिर-शाहरुखवर ताशेरे ओढले आणि लिहिले की, ‘एसआरकेने ट्यूबलाइट, रॉकेट्री, लाल सिंग चड्ढा, ब्रह्मास्त्रमध्ये पाहुणे भूमिका केल्या आहेत आणि ते सर्व सुपर फ्लॉप आहेत. म्हणजे शाहरुख बॉलीवूडचा नाश करणार आहे.
केआरकेच्या या ट्विटवर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्याच्या या ट्विटवर लोक त्याला खडे बोल सुनावत आहेत. या ट्विटला उत्तर देताना युजरने लिहिले की, “ए दिल है मुश्किल आणि साथिया हे हिट चित्रपट होते.” त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, “तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की रॉकेट्री हिट ठरली.” याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले की, “जीभेवर नियंत्रण ठेवा, अशी बेलगाम जीभ चांगली नाही.”
आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट आज म्हणजेच 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. लोकांना हा चित्रपट आवडला आहे. या चित्रपटाद्वारे आमिर चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे. या चित्रपटात शाहरुख खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. यामध्ये आमिर व्यतिरिक्त करीना कपूर, नागा चैतन्य आणि मोना सिंग यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
हेही वाचा –
दिल्लीत रतन राजपूतसोबत घडली भीषण घटना, ‘एक व्यक्ती रस्त्यावर ओढत होतं…….’
भूमी पेडणेकरने हुमा कुरेशीला का म्हटले कॉपी कॅट? बॉलिवूड मध्ये नव्या वादाला सुरुवात
‘कच्चा बदाम’ फेम अंजली अरोराचे नवीन गाणे ‘सइयां दिल में आना रे’ रिलीज, एकदा पाहाच