विनोदाच्या जगातील महत्त्वाचं नाव म्हणजे कृष्णा अभिषेक होय. तो एक लोकप्रिय विनोदी अभिनेता आहे. त्याचे खरे नाव अभिषेक शर्मा हे आहे. बॉलिवूड मधील सुपरस्टार गोविंदा हा कृष्णाचा मामा आहे. त्याच्या कॉमेडी टायमिंगमुळे सर्वत्र त्याचे कौतुक होत असते. त्याची पत्नी कश्मीरा शाह ही देखील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. रविवारी (३० मे) कृष्णा अभिषेक हा त्याचा 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त जाणून घेऊया कृष्णा आणि कश्मीराची प्रेम कहाणी.
कश्मीरा हिला रील आणि रिअल लाईफमध्ये खूप बोल्ड मानले जाते. कश्मीराने या गोष्टीचा खुलासा करून सर्वांना हैराण केले आहे की, लग्नाआधी तिने आणि कृष्णाने वन नाईट स्टँड केले होते. 2012 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत कश्मीराने सांगितले होते की, “आम्ही एकत्र एका चित्रपटात काम करणार होतो. तोपर्यंत मला कृष्णाबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यावेळी मला एवढेच माहित होते की, मला गोविंदाच्या भाच्यासोबत काम करायचे आहे. त्यामुळे मी कधी हाय हिल्स नाही घातले.”
ते दोघे कसे एकत्र आले हे सांगताना तिने सांगितले की, “हा आमच्या दोघांसाठी वन नाईट स्टँड होता.” तेव्हाच कृष्णाने सांगितले की, “खरंतर हे प्रत्येकासोबत होत असतं पण या गोष्टीचा कोणी स्वीकार करत नाही. पण त्या रात्री नंतर ती माझी खूप काळजी घेऊ लागली. माझ्यासाठी जेवण आणू लागली.”
कृष्णाने सांगितले की, “कश्मीराने तिच्याकडून मला हिंट दिली होती. एकदा असंच काहीसं झालं. आम्ही दोघे एका व्हॅनमध्ये बसलेलो होतो, तेव्हा अचानक लाईट गेली. त्यावेळी मी म्हणालो, आता काय करायचं, तेव्हा ती म्हणाली चल काहीतरी करु या. आता अशा परिस्थितीत कोणीही असचं बोलणार ना!!”
कश्मीराचे आधीच लग्न झाले होते. परंतु तिच्या आयुष्यात काही ठीक चालले नव्हते. जेव्हा कश्मीराने तिच्या पती पासून लांब होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा कृष्णा खूप खुश झाला होता. ती कृष्णापेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे. पण त्यांनी या गोष्टीचा विचार नाही केला. त्यांना सरोगसीद्वारे दोन जुळी मुले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-