Tuesday, February 10, 2026
Home बॉलीवूड कृष्णा अभिषेकने गोविंदासोबतचा जुना फोटो पोस्ट करत दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा; बहिणीनेही केली मजेशीर कमेंट

कृष्णा अभिषेकने गोविंदासोबतचा जुना फोटो पोस्ट करत दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा; बहिणीनेही केली मजेशीर कमेंट

आपल्या अफलातून कॉमेडीमुळे आणि कपिल शर्मा शो मधील ‘सपना’ या भूमिकेमुळे नावारूपास आलेला विनोदी कलाकार म्हणजे कृष्णा अभिषेक. कृष्णा अभिषेकची दुसरी ओळख म्हणजे तो बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेता असलेल्या गोविंदाचा भाचा आहे. असे असूनही कृष्णा अभिषेकने मिळवलेले यश हे स्वबळावर आणि मेहनतीच्या जोरावर मिळवले आहे. कृष्णाने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला.

मागच्या काही काळापासून कृष्णा सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत येत आहे. गोविंदा आणि कृष्णा अभिषेक यांचा अनेक दिवसांपासून शाब्दिक वाद सुरू आहे. या वादावर दोघांनीही भाष्य केले आहे, तरीही हा वाद मिटण्याची काही चिन्हे दिसत नाही. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असणाऱ्या कृष्णाने त्याच्या अकाउंटवरून एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे पुन्हा एकदा कृष्णा चर्चांचा भाग बनला आहे.

याचे कारण म्हणजे कृष्णाने जो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे त्यात गोविंदा देखील आहे. या फोटोमध्ये कृष्णा अभिषेक आणि त्याची बहीण आरती सिंग दिसत असून सोबतच गोविंदा सुद्धा आहे. हा बालपणीचा फोटो शेअर करत कृष्णाने लिहिले की, “आणि अशाच पद्धतीने आम्ही ची ची मामासोबत मस्ती करायचो. पार्टी करायचो. मामा आम्हाला नेहमी ५ स्टार हॉटेलमध्ये जेवायला घेऊन जात आणि आम्ही तिथे खूप दंगा मस्ती करायचो. फोटोच्या उजव्याबाजूला क्यूट दिसणारी चोर टाइप मुलगी म्हणजे आरती आणि हिरव्या रंगाच्या टी शर्ट मध्ये वेड्यासारखी पोज असणारा मी अजूनही नाही बदललो.”

हा फोटो पाहून गोविंदासोबत असणारी बच्चे कंपनी किती मस्ती करत असेल याचा अंदाज आपण नक्कीच लावू शकतो. कृष्णाच्या या फोटोवर त्याची बहीण आरती सिंगने लिहिले की, “मी चोर टाईप, तर तू चितचोर दिसतोय.” यासोबतच चाहत्यांनीही कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांनी त्याला मामासोबत सुरू असलेला वाद मिटवण्याची विनंती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा