Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड कश्मिराने पुन्हा साधला गोविंदाची पत्नी सुनीतावर निशाणा; म्हणाली, ‘सध्याच्या मॅनेजरला नोकरीवरून काढून टाका’

कश्मिराने पुन्हा साधला गोविंदाची पत्नी सुनीतावर निशाणा; म्हणाली, ‘सध्याच्या मॅनेजरला नोकरीवरून काढून टाका’

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याचा पुतण्या कृष्णा अभिषेक यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. दोघांमधील संबंध चांगले नाहीत. कोणत्याही कारणास्तव अनेकदा दोघे एकमेकांना लक्ष्य करत राहतात. या लढाईत गोविंदा आणि कृष्णाची पत्नी सुनीता आहुजा आणि कश्मिरा शाह देखील एकमेकांना ऐकवत राहतात. पुन्हा एकदा कश्मिराने सुनिताला लक्ष्य केले आहे.

मामा-भाच्याची जोडी पुन्हा एकदा एकत्र काम करताना पाहण्याची इच्छा असल्याचं कश्मिराने म्हटले आहे. पण त्याचवेळी गोविंदाला चांगल्या मॅनेजरची गरज आहे, तेव्हाच हे घडू शकतं, असंही ती म्हणाली आहे. गोविंदाची पत्नी सुनीता सध्या त्याची मॅनेजर असल्याने तिने म्हटले आहे.

‘तुमच्या मॅनेजरला नोकरीवरून काढा’
कश्मिरा म्हटली आहे की, “त्यांनी त्यांच्या सध्याच्या मॅनेजरला नोकरीवरून काढून टाकावे आणि त्यांना त्या जागी एक चांगला मॅनेजर मिळावा आणि त्यांना चांगले काम मिळावे. हे तेव्हाच होऊ शकते. जो आता त्यांचे काम पाहात आहे ते खूप निरुपयोगी आहे. गोविंदा जी खूप टॅलेंटेड अभिनेते आहेत, त्यांनी घरी बसू नये.

कश्मिरा पुढे म्हणाली की, “मलाही सलमान खानच्या कुटुंबाप्रमाणे कुटुंबाचा एक भाग व्हायचे आहे. जे नेहमी एकमेकांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतात. प्रत्येक कुटुंब त्यांच्यासारखे का नाही? काश कृष्णाच्या कुटुंबाने त्याला प्रेरणा दिली असती. त्याने संपूर्ण कुटुंबाला फायदा होईल, अशा प्रकारे काही केले का? या सर्वांमध्ये खूप टॅलेंट आहे पण कोणी कोणाला प्रेरणा देत नाही.” कश्मिरा शेवटी म्हणाली की, ती इतरांसारखी नाही जी निष्क्रिय राहू शकते आणि तिच्याबरोबर तिच्या पतीच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करू शकते.

काही दिवसांपूर्वी गोविंदा पत्नी सुनीतासोबत ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये गेला होता. त्यावेळी त्याचा भाचा कृष्णा अभिषेकने त्या भागाचा भाग होण्यास नकार दिला होता. त्यानंतर दोघांनी एकमेकांवर निशाणा साधला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-उदित नारायण यांना पाहून कृष्णा अभिषेकला आली मामा गोविंदाची आठवण; सर्वांसमोर म्हणाला…

-कृष्णा अभिषेकला माफ करण्यास तयार नाही मामा गोविंदा अन् मामी सुनीता; म्हणाला, ‘मी या दुश्मनीला…’

-मामा-भाच्याचे नातं इतकं कसं बिघडलं? जाणून घ्या कृष्णा अभिषेक आणि गोविंदामधील वादाच कारण

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा