कृष्णा अभिषेकला माफ करण्यास तयार नाही मामा गोविंदा अन् मामी सुनीता; म्हणाला, ‘मी या दुश्मनीला…’


कॉमेडियन कृष्णा अभिषेक आणि बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांच्यातील मतभेदाला तीन वर्ष होतील. बऱ्याच काळापासून, मामा आणि भाचा एकमेकांसोबत बोलणे तर दूर, पण एकमेकांसमोर देखील येत नाहीत. आता दोघांच्या या मतभेदावर कृष्णा अभिषेकचे ताजे विधान समोर आले आहे. कृष्णाचे म्हणणे आहे की, त्याने त्याच्या मामा-मामीकडे त्याच्या चुकीबद्दल अनेक वेळा माफी मागितली आहे. मात्र, ते माफ करण्यास तयार नाहीत.

तो म्हणाला की, तो रोजच्या बोलण्याला आणि या दुश्मनीला कंटाळला आहे. अलीकडेच, गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचले होते. मात्र, कृष्णा अभिषेक या एपिसोडमध्ये अनुपस्थित होता.

‘द कपिल शर्मा शो’नंतर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा म्हणाली होती की, तिला कृष्णा अभिषेकचा चेहरा देखील पाहायचा नाही. आता त्यांच्या या विधानावर कृष्णा अभिषेकची प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, “मला माहिती आहे की, माझ्या मामीने माझ्याविरुद्ध अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अर्थात, मी निराश आहे, पण आता मला असे वाटते की, ते माझ्यावर खूप रागावले आहेत. कारण त्या माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतात. ते म्हणाले की, ‘चित्रपटातील डायलॉगप्रमाणे मला त्याचा चेहरा पुन्हा कधीच पाहायचा नाही.’ हे सिद्ध करते की, त्या माझ्यामुळे दुखावल्या गेल्या आहेत.”

कृष्णा अभिषेक पुढे म्हणाला की, “जो तुमच्यावर प्रेम करतो त्यालाच तुम्ही दुखावू शकता. मी पण माझ्या मामा आणि मामीवरही प्रेम करतो. मी त्यांची माफी मागतो. मी अनेकवेळा प्रयत्न केला, पण ते माझी माफी स्वीकारणार नाही आणि तीच माझी समस्या आहे.”

कॉमेडियन म्हणाला की, “मी त्यांच्या मुलासारखा आहे, जर हे खरे असेल तर ते मला माफ करायला का तयार नाही? मी अनेकवेळा अनेक मुलाखतींमध्ये असे म्हटले आहे की, आम्ही आमचे प्रश्न सोडवू आणि त्यांनी तसेही सांगितले आहे, पण आम्ही अजूनही त्याच ठिकाणी उभे आहोत. तो म्हणाला की, त्यांची नाराजी मला त्रास देत आहे. मी आतून दु: खी आहे. मी या दुश्मनीला कंटाळलो आहे. ते लोक माझ्या पालकांसारखे आहेत.”

गोविंदा आणि कृष्णा यांच्यातील मतभेद संपण्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा भारताबद्दल परदेशी होस्टने ऐश्वर्याला विचारला ‘हा’ प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले होते सडेतोड प्रत्युत्तर

-‘एकेकाळी टॅक्सीमध्ये बसणे अभिमानाची गोष्ट होती’, अनिल कपूर यांनी ‘त्या’ दिवसांची काढली आठवण

-तब्बल ३० वर्षानंतर अजय देवगणने रिक्रिएट केला त्याचा ‘सिग्नेचर स्टंट’; ट्रकवर केली जबरदस्त ऍक्शन


Leave A Reply

Your email address will not be published.