[rank_math_breadcrumb]

सेंसर बोर्डाचा शॉक! ‘कुबेरा’च्या १४ मिनिटांचा काप!

कुबेरा‘ (Kubera) च्या ट्रेलरमुळे प्रेकक्षकांची उत्सुकता खूपच वाढली आहे. धनुष आणि नागार्जुन यांचा हा चित्रपट 20 जूनला थेटर मध्ये प्रदर्शित हाेणार आहे. शेखर कम्मुला यांचा ‘कुबेरा’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. धनुष आणि नागार्जुन यांचा हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये येताेय. पण त्याआधीच सेंसर बाेर्डाने चित्रपटाला थाेडासा धक्का दिला आहे. मुळ चित्रपट 3 तास 15 मिनिटांचा हाेता, पण सेंसर बाेर्डाने त्यातले 14 मिनिटं कापून टाकलेत. त्यामुळे आता हा चित्रपट 3 तास 1 मिनिटांचा झाला आहे.

‘कुबेरा’ हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, म्हणजे ताे वेगवेगळ्या भाषांमधल्या प्रेक्षकांसाठी बनवलेला आहे. हा चित्रपट हिंदि, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलीज हाेणार आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना भावनांसाेबत जाेरदार अ‍ॅक्शनही पाहायला मिळणार आहे. ट्रेलरमध्ये चित्रपटाची गाेष्ट थाेडक्यात दाखवली आहे आणि कलाकारांची झलकही दिसते.

16 जूनला हैदराबादमध्ये झालेल्या प्री-रिलिझ कार्यक्रमात ‘कुबेरा’ चा ट्रेलर लाॅन्च करण्यात आला. ट्रेलर पाहिल्या नंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. धनुष आणि रश्मिका यांची केमिस्ट्री एकदम मस्त वाटतीये. इतकंच नाही तर, अनेक लाेकांनी ट्रेलर पाहून हा चित्रपट ब्लाॅकबस्टर ठरेल असंही म्हटंल आहे.

‘कुबेरा’ या चित्रपटात धनुष आणि नागार्जुन साेबत रश्मिका मंदनाही मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. तसेच अक्किनेनी आणि जिम सर्भ हे कलाकारही चित्रपटात झलकणार आहेत. या चित्रपटात दलीप ताहिल, सयाजी शिंदे, दिव्या डेकाटे, हरीह पेराडी आणि इतर कलाकारही महत्तवाच्या भुमिकेमध्ये दिसणार आहेत. शेखर कम्मुला दिग्दर्शित हा चित्रपट 20 जून 2025 राेजी चित्रपटगृहात प्रदर्शित हाेणार आहे. या दिवशीच अमिर खानचा ‘सितारे जमीन पर’ चित्रपट देखील येताेय. त्यामुळे दाेनही चित्रपटांमध्ये जाेरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

या बच्चनने स्वतः केलेला करिश्मा कपूरचा भावी ‘सून’ म्हणून उल्लेख, मग का तुटले अभिषेक- करिश्माचे लग्न
३० वर्षांची कारकीर्द ६० व्या वर्षी दुसरे लग्न; या अभिनेत्याचा प्रवास अजिबातच सोप्पा नव्हता…