Wednesday, July 3, 2024

‘कुछ कुछ होता है’ फेम सरदारजीने तब्बल 25 वर्षांनंतर घेतली शाहरुखची भेट; म्हणाला, ‘जेव्हा पठाण…’

बॉलिवूडमधील किंग खान अर्थातच शाहरुख खानने आपल्या 30 वर्षाच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. मात्र प्रेक्षकांचा आणि स्वत: शाहरुखचा ऑल टाइम फवरेट चित्रपट म्हटलं तर त्या यादीमध्ये ‘कुछ कुछ होता है‘ या चित्रपटाचा नक्कीच उल्लेख होत असेल. यामध्ये अनेक दमदार कलाकारांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या मात्र, या सगळ्यांपैकी एका छोट्या सरदारजी बाल कलाकाराने अनेकांच लक्ष वेधलं, तो बाल कलाकार म्हणजेच अभिनेता परझान दस्तूर होय. त्याने आपल्या निरागस स्वभावाने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. तब्बल 25 वर्षानंतर अभिनेत्याने नुकतंच शाहरुखची भेट घेतली आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

शाहरुख खान (Shahrukh Khan) स्टारर ‘कुछ कुछ होता है’ (Kuch Kuch Hota Hain) चित्रपटाने कायमच प्रेक्षकांवर राज्य केलं आहे. आजही हा चित्रपट चाहते त्याच उत्सुकतेने पाहात असतात. चित्रपटाची चर्चा सुरु झाली की यामधले अनेक कलाकार आपल्या डोळ्यामोर उभे राहतात. त्यापैकीच छोटा सरदारजी म्हणजेच परझान दस्तूर (Parzaan Dastur)याची भूमिका देखिल आपल्या डोळ्यासमोर येते. त्याने चित्रपटामध्ये न बोलताच साध्या निर्मळ स्वभावाने अनेकांचं लक्ष वेधलं. अशातच परझानने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शाहरुख सोबत तब्बल 25 नंतरच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये छोटा सरदारजी किती बदलला आहे हे पाहायला मिळालं.

 

View this post on Instagram

 

कुछ कुछ होता है चित्रपटामधील एक क्युट सरदारजी दिसणारा कलाकार आता हॅंडसम हंक परझान बनला आहे. “जब पठाणसे मिला परझान” असं कॅप्शन देत त्याने शाहरुख खान सोबतचा फोटो शेअर केला आहे. 25 वर्षानंतरच्या या भेटीचे फोटो चहाते देखिल पसंद करत आहेत.

 

View this post on Instagram

 

सांगायचे झाले तर परझान एक अभिनेता असण्यासोबतच शाहरुख खानचा मोठा फॅन आहे. याचा अंदाज आपण परझानच्या इंस्टावर शेअर केलेल्या फोटोंवरुन सहजच लावू शकतो. परझान सध्या 31 वर्षाचा असून नुकतांच विवाह बंधनात अडकला आहे. त्याने आपल्या करिअरमध्ये ‘कुछ कुछ होता है, ब्रेक के बाद, कहता है दिल बार बार, सिकंदर, और हम तुम’ सारख्या अनेक चित्रपचांमध्ये काम केलं आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
इंडियन आइडल १३ च्या निमित्ताने तब्बल ५० वर्षांनी सोबत दिसणार धर्मेंद्र आणि मुमताज यांची हिट जोडी
पेमेंट थकवल्याच्या शैलेश लोढा यांच्या आरोपांवर निर्मात्यांनी दिले स्पष्टीकरण, म्हणाले…

हे देखील वाचा