Tuesday, September 26, 2023

श्रद्धाने केवळ टीव्हीच नव्हे, तर साऊथमध्येही वाजवलाय अभिनयाचा डंका; दोनदा साखरपुडा तोडून केलं होतं सर्वांना चकित

टेलिव्हिजनवर अनेक अभिनेत्री काम करतात. पण त्यांच्याकडे पाहून वैयक्तिक आयुष्यात देखील प्रेक्षक प्रभावित होतील, अशा अभिनेत्री खूप कमी आहेत. अशीच आपल्या अभिनयाच्या जोरावर घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे श्रद्धा आर्या. नाही ओळखलं का? श्रद्धा म्हणजे ‘कुंडली भाग्य’ या मालिकेतील आपल्या सर्वांची लाडकी प्रीता. ‘कुंडली भाग्य’ या मालिकेत ती मुख्य भूमिकेत काम करत आहे. याआधी देखील तिने अनके मालिकांमध्ये काम केले आहे. पण या मालिकेतील तिचे पात्र प्रेक्षकांना खास पसंत पडले आहे. तिच्या गोड आणि सालस स्वभावाने तिने समस्त प्रेक्षकवर्गाला भुरळ घातली आहे. श्रद्धा गुरूवारी (17 ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मंडळी जाणून घेऊया तिच्या प्रवासाबद्दल.

श्रद्धाचा जन्म 17 ऑगस्ट 1987 साली नवी दिल्ली येथे झाला आहे. तिचे शालेय शिक्षण देखील तिथेच पूर्ण झाले आहे. तिने मुंबई विद्यापीठातून एम.ए. अर्थशात्र ही पदवी संपादन केली आहे. परंतु अभिनयात जास्त रस असल्याने, ती अभिनय क्षेत्राकडे वळाली. तिने ‘कालवानीन कढाली’ या तमिळ चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. यानंतर तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. तिने ‘मै लक्ष्मी तेरे आंगण की’, ‘तुम्हारी पाखी’, ‘ड्रीम गर्ल’, या मालिकांमध्ये काम केले आहे. यासोबत तिने हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘गोदावा’, ‘पाठशाला’, ‘मदुवे माने’, ‘नि:शब्द’, ‘बंजारा : द ट्रक ड्रायवर’, ‘डबल डेकर’, ‘कोथीमुका’, ‘वंदे मातरम’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे.

तसेच तिने 2009 मध्ये रियॅलिटी शो ‘नच बलिये’ मध्ये भाग घेतला होता. त्यावेळी तिने खुलासा केला होता की, ती व्यावसायिक आलम मक्कर याला डेट करत आहे. (kundali bhagya fame shraddha arya celebrte her birthday, lets know about her)

या शोमध्ये असताना त्यांच्या नात्याबाबत अनेक बातम्या पसरत होत्या. श्रद्धा आणि आलम यांच्या बाबतीत ही गोष्ट समोर आली होती की, त्या दोघांनी साखरपुडा देखील केला आहे. माध्यमातील वृत्तानुसार श्रद्धा आणि आलम केवळ या शोसाठी रिलेशनमध्ये आले होते. हा शो संपल्यानंतर केवळ दोन महिन्यात त्यांचे ब्रेकअप झाले होते.

श्रद्धाने 2015 मध्ये जयंत नावाच्या एनआयआरसोबत साखरपुडा केला होता. परंतु काही दिवसांनी त्यांनी त्यांचे नाते संपवले आणि त्यांचा साखरपुडा तोडून टाकला. माध्यमातील वृतानुसार जयंतने तिला अभिनय सोडण्यास सांगितले होते, कारण त्याला हे सगळे आवडत नव्हते. त्यामुळे श्रद्धाने साखरपुडा तोडला होता.

श्रद्धा हि टेलिव्हिजनवरील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती एका दिवसाची 60 हजार एवढी फी घेते. 2021 मध्ये श्रद्धाचे नेटवर्थ 50-60 कोटी आहे.

श्रद्धा ऑनस्क्रीन जेवढी सोज्वळ आणि संस्कारी सून आहे. तेवढीच तिच्या वैयक्तिक आयुष्यात ती बोल्ड आणि मॉर्डन आहे. ती सोशल मीडियावर नेहमीच तिच्या हॉटनेसचा तडका लावत असते. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे.

अधिक वाचा- 
‘बापल्योक’ चित्रपटाच्या यशासाठी टीमचे माता तुळजाभवानीला साकडे; पाहा फोटो
‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या लूकने उडवली खळबळ, एकदा फोटो पाहाच

हे देखील वाचा