Thursday, September 28, 2023

‘बापल्योक’ चित्रपटाच्या यशासाठी टीमचे माता तुळजाभवानीला साकडे; पाहा फोटो

अनेकदा मुल आपल्या आईची व्यथा समजूण घेतात. पण त्यांनी बापाची तळमळ समजत नाही. आयुष्याच्या वाटेवर अपेक्षा, जबाबदारीचे ओझे घेऊन धावणारा बाप कसा जगतो, हे जेव्हा मुलांना समजायला लागते. त्यावेळी मुलांची खूप धावपळ होते. प्रवास केल्याशिवाय जगणं समजत नाही. आणि दुसऱ्याची बाजूही माणसाला कळत नाही. हाच प्रवास नागराज मंजुळे यांच्या ‘बापल्योक’या चित्रपटात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून नागराज मंजुळे यांचा अगामी चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाचे नाव ‘बापल्योक’ (Baplyok) आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना बाप लेकाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट वडिल मुलाच्या नात्याची हळुवार गोष्ट घेऊन 25 ऑगस्टला आपल्या भेटीला येणारा आहे. ‘बापल्योक’ या मराठी चित्रपटाचा सध्या ट्रेलर आणि गीतांमुळे चांगलाच गाजतोय. नुकतीच या चित्रपटाच्या टीमने तुळजापूरच्या तुळजाभवानी आईचे दर्शन घेऊन चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली आहे.

विशेष म्हणजे ‘बापल्योक’ या चित्रपटाचे शूटिंग तुळजापूर परिसरातील असून चित्रपटातील बहुतांशी कलाकार तुळजापूर, सोलापूर परिसरातील आहेत. मकरंद माने या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे.

या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मनापासून केलेली चांगली कलाकृती प्रेक्षकांपर्यत पोहचते.

‘बापल्योक’ चित्रपटाच्या ट्रेलर आणि गीताला मिळलेला प्रतिसाद हेच दाखवून देतो. हा चित्रपट अनेक नानाविध नात्यांची गुंफण असून बापलेकाच्या नात्यातील मायेचा पदर उलगडून दाखविणारा ‘बापल्योक’ प्रत्येकाला खूप काही देणारा असेल, असा विश्वास निर्माते विजय शिंदे व्यक्त करतात. (The team of the movie ‘Bapalyok’ had the darshan of Tuljabhavani Mata)

अधिक वाचा- 
रंगभूमीपासून दयाबेनने केली अभिनयाला सुरुवात, शाहरुख खानच्या ‘या’ चित्रपटातही झळकली अभिनेत्री
संतापजनक! युक्रेनच्या गायिकेकडून तिरंग्याचा अपमान, लाईव्ह कॅान्सर्टमध्ये फेकला झेंडा; पुण्यात तक्रार दाखल

हे देखील वाचा