Wednesday, February 21, 2024

‘अशा वेळी स्वतःला बदलायचे’ म्हणत कुशल बद्रिकेने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

कुशल बद्रिके हे नाव उच्चारताच प्रत्येकाच्या डोळ्यासमोरून झर्रकन चला हवा येऊ द्या मधून खळखळून हसवणारा एक व्यक्ती डोळ्यासमोरून जातो. कुशल नाव उच्चरताच विनोद हा शब्द आपसूकच तोंडात येतो. कुशल बद्रिके मोठ्या मेहनतीने आणि कष्टाने त्याचे करियर घडवले आणि लोकांच्या हृदयात स्थान मिळवले. टीव्हीसोबतच तो विविध चित्रपटांमध्ये देखील दिसत असतो. चला हवा येऊ द्या शोने त्याला अमाप लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

सोशल मीडियावरही कुशलचा वावर खूपच चांगला आहे. तो सतत आयुष्याशी संबंधित अशा गंभीर पोस्ट शेअर करत असतो. त्याची लोकांच्या मनात तयार झालेली प्रतिमा बघता कुशल एवढा गंभीर विचार करत असेल असे पटकन वाटत नाही. मात्र अनेकदा तो त्याचे विचार सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. कुशलचे इंस्टाग्राम अकाउंट पहिले तर आपल्या लक्षात येईल की कुशल आयुष्याकडे किती वेगळ्या नजरेने बघतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kushal Badrike (@badrikekushal)

आता पुन्हा एकदा कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने रात्री येणाऱ्या विचारांबद्दल त्याचे मत व्यक्त केले आहे. कुशलने या पोस्टमध्ये लिहिले आहे, “रात्रभर झोपू न देणारी दुःख सुद्धा असतात माणसाला , मनातली तळमळ अंतरात उतरत जाते हळू…हळू … रात्रभर हे विचारांचं वादळ घेऊन आपलं ह्या कुशीवरून त्या कुशीवर, आणि त्या उशीवरून ह्या उशीवर . “वास्तुशास्त्रानुसार” झोपायच्या दिशा आणि जागा बदलून सुद्धा झोप लागत नाही. अश्या वेळी मग आपण स्वतःला बदलायचं. :- सुकून”,

त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांनी कमेंट्स करत त्याच्या लिखाणाचे कौतुक केले असून, ‘तुम्हाला एवढे चांगले सुचते कुठून असे देखील विचारले आहे. दरम्यान सध्या कुशलची ही पोस्ट चांगलीच गाजत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

‘मैत्रीत जाणीव पाहिजे आणि…’ सुनील शेट्टीने सलमान आणि त्याच्या नात्यावर भाष्य

हे देखील वाचा