चला हवा येऊ द्या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके (Kushal Badrike) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून तो नेहमीच वेगवेगळया पोस्ट करुन चर्चेत असतो. सध्या कुशल बद्रिकेची अशीच एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने प्रविण तरडे यांच्या सरसेनापती हंबिरराव चित्रपटाचे कौतुक करताना एक मोलाचा संदेश दिला आहे. काय आहे ही पोस्ट चला जाणून घेऊ.
कुशल बद्रिके हा मराठी सिनेजगतातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या तुफान विनोदी भूमिकांनी तो प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करत असतो. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील त्याच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होताना दिसत असते. सध्या कुशल बद्रिकेची एक सोशल मीडिया पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने प्रविण तरडे यांच्या सरसेनापती हंबिरराव चित्रपटाचे तोंडभरुन कौतुक केले आहे. आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
या व्हायरल पोस्टमध्ये कुशल बद्रिकेने ” ‘हंबीरराव ‘एक दैदीप्यमान सिनेमा. एखादं ऐतिहासिक पुस्तक वाचताना, आपल्या डोळ्यांसमोर काही चित्र उभी रहातात, काही प्रसंग तर चक्क दिसू लागतात, पण ‘हंबीरराव’ हा सिनेमा आपल्याला इतिहासात घेऊन जातो, आपण आपलं अस्तित्व विसरून इतिहास जगू लागतो. त्या लढायांमध्ये एखादी तलवार हाती घेऊन आपणही स्वराज्याच्या पायरीला शत्रूच्या रक्ताने आणि आपल्या प्राणाने अभिषेक घालावा असं वाटत राहतं.
प्रवीण तरडे मित्रा ह्या सिनेमासाठी मी तुझा आणि तुझ्या निर्मात्यांचा, कायम ऋणी राहीन. इतिहास आपल्याला जगायला शिकवतो, आपल्या मुलांना जर कसं जगायचं ? हे शिकवायचं असेल तर त्यांना सर ‘सेनापती हंबिरराव’ नक्की दाखवा” असा संदेश दिला आहे. सध्या कुशल बद्रिकेची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.