Thursday, June 1, 2023

प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांना मातृशोक, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाले….

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, निर्माते रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्या कुटूंबावर दुखःचा डोंगर कोसळला असून रवी जाधव यांच्या मातोश्रींचे दुखःद निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. रवी जाधव यांच्या आई शुभांगी जाधव यांनी ७४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रवी जाधव यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन या निधनाची माहिती दिली आहे. या बातमीने अनेकांनी रवी जाधव यांचे सांत्वन केले आहे. 

रवी जाधव यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून याबद्दलची पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आईचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी “आई १९ जुलै १९४८ – २७ मे २०२२” असा कॅप्शन दिला आहे. त्यांची ही पोस्ट पाहताच अनेकांनी त्यावर श्रध्दांजलीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच अनेक कलाकारांनी रवी जाधव यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

याआधी गेल्या वर्षी रवी जाधव यांचे  वडिल हरिश्चचंद्र भिकाजी जाधव यांचे दुखःद  निधन झाले होते.  वडिलांच्या निधनानंतर रवी जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त केला होता. या पोस्टमध्ये त्यांनी “वडिलांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन झाले असून पप्प नेहमीच हसत खेळत असायचे. या कठीण काळात आमच्या कुटूंबियाला आधार देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानतो,” असा कॅप्शन देत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. एकाच वर्षात वडिलांचे आणि आईचे छत्र हरवल्याने रवी जाधव यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान रवी जाधव हे मराठी चित्रपट जगतातील यशस्वी निर्माते आणि दिग्दर्शक आहेत. अनेक यशस्वी चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा