Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा…’ कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट आली जोरदार चर्चेत

‘चला हवा येऊ द्या’ या शोने आख्या महाराष्ट्रात त्याची हवा निर्माण केली आहे. याचे श्रेय या शोमधील सगळ्या कलाकारांना जातं. सगळ्यांनी मेहनत करून या शोला मोठे केले आहे. या शो मधील सगळेच कलाकार अव्वल आहेत परंतु कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांची बात काही वेगळीच आहे. त्यांच्या कॉमेडीने नेहमीच सगळ्यांची मनं जिंकून घेत असतात. दोघेही सहकलाकार असले तरी देखील त्यांच्या आयुष्यात ते दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. अशातच गुरुवारी (३ मार्च) रोजी भाऊ कदमने त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी अनेकांनी त्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु कुशल बद्रिकेने त्याला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिले आहेत.

बद्रिकेने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून भाऊ कदमसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ म्हटल्यावर कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की, हा कोणतरी कॉमेडी व्हिडिओ असेल पण असं नाही. कुशल बद्रिकेने जो व्हिडिओ शेअर केला, त्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, कुशल बद्रिके व्हिडिओ काढत आहे आणि भाऊ कदम बेडवर झोपून चक्क घोरत आहे. त्याच्या घोरण्यामुळे कुशल बद्रिकेला झोप येत नाहीये आणि त्याचं हेच दुऊख व्हिडिओमधून व्यक्त करत आहे.

हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा घेणारा एकमेव माणूस म्हणजे भाऊ कदम. प्रियसी कशी आपली झोप उडवते तसेच माझी झोप उडवणाऱ्या माझ्या मित्रा तुला वाढदिवसाच्या घनघोर शुभेच्छा.” त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे अनेक जण त्यांच्या या पोस्टवर कमेंट करून त्यांना प्रतिक्रिया देत आहे.

भाऊ कदमचे अनेक चहाते देखील या पोस्टवर कमेंट करत आहेत आणि व्हिडिओचे कौतुक केले आहे . तर बरेच जण भाऊ कदमला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.भाऊ कदम आणि कुशल बद्रिके या दोघांनी सुरुवातीला ‘फुबाईफु’ या शोमध्ये काम केले. तिथूनच निलेश साबळेने त्यांना घेऊन ‘चला हवा येऊ द्या’ हा शो बनवला. या शोमध्ये त्यांच्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत. भाऊ कदमची शांताबाई असो किंवा कुशल बद्रिकेची फरुळे बाई असो त्यांच्या प्रत्येक अभिनयाने प्रत्येक रूपाने आज त्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या मनावर गारुड घातली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा