Friday, May 24, 2024

बॉलिवूडमध्ये नेटवर्किंग करण्यात सुष्मिता सेन अपयशी, म्हणूनच मिळाले नाही मनाजोगे काम स्वतः केला खुलासा

बॉलिवूडमध्ये कलाकार हे सलग अनेक वर्ष चित्रपटांमध्ये काम करतात. मात्र कधी काही काही कलाकार अचानक चित्रपटांमधून गायब होतात.कलाकार असे गायब झाल्यानंतर त्यांना काम मिळत नसेल अशा आशयाच्या चर्चा मीडियामध्ये आणि लोकांमध्ये होतात. अशाच काहीशा चर्चा झाल्या अभिनेत्री सुष्मिता सेनबद्दल. सुश्मिता बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये गणली जाते. मात्र मधल्या काळात ती अचानक या क्षेत्रातून गायब झाली. जवळपास १० वर्ष ती मोठ्या पडद्यापासून लांब होती. मात्र आपल्या कामावर परतण्यासाठी तिला खूपच मेहनत करावी लागली.

sushmita sen
Photo Courtesy : Instagram/sushmitasen47

सुष्मिताने एका मुलाखतीमध्ये तिच्या संघर्षाबद्दल आणि या 10 वर्षांच्या मोठ्या गॅपबद्दल सांगितले होते. सुश्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकल्यापासून ते बॉलिवूडमध्ये यश मिळ्वण्यापर्यंत सुश्मिताने मोठा पल्ला पार केला आहे. अभिनयासोबतच मॉडेलिंग जगातही ती खूपच यशस्वी झाली. आता सुश्मिताने ‘आर्या’ या सुपरहिट वेबसिरीजमधून दणक्यात पुनरागमन केले. आता या सिरीजचे दुसरा भाग देखील गाजत आहे. मात्र सुष्मिताला बॉलिवूडमध्ये तिच्या मोठ्या करिअरमध्ये त्या भूमिका करायला नाही मिळाले ज्या तिला करण्याची इच्छा होती. यासाठीच तिने वेबसिरीजमध्ये काम करण्याचे ठरवले. सुष्मिता सेनची 2010 साली ‘दूल्हा मिल गया’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात फरदीन खान आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर 2020 साली तिने ‘आर्या’ या वेबसिरीजमधून काम करत डिजिटल प्लँटफॉर्मवर पदार्पण केले. याआधी ती तिच्या दोन मुलींचा संगोपनात व्यस्त होती.

Photo Courtesy : Instagram/sushmitasen47

या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की, “10 वर्ष मी माझ्या गोष्टी सांभाळत होती. मला सांगितले जात होते की, मी काय करावे काय करू नये. जे चित्रपट मला करायचे होते ते माल मिळत नव्हते. सर्वच मला एक सारख्यच भूमिका देत होते. यासाठीच मी 10 वर्ष काम करू शकले नाही. तसे पाहिले तर मी नेटवर्कमध्ये देखील खूपच अपयशी ठरली. माझ्यासाठी हे काम नाही करत.” आतापर्यंत ‘आर्या’ या सीरिजचे दोन सिझन आले आहेत. (sushmita sen claims she got less work because of her failure to do networking in bollywood)

हेही वाचा-
‘विजय देवरकोंडा जास्त आवडतो की मी?’ रणबीर कपूरच्या प्रश्नावर रश्मीकाने दिले ‘असे’ उत्तर
बाई ऐकावं ते नवलंच! वयाच्या 48 व्या वर्षी सुष्मिता सेनच्या मनात फुलतायेत प्रेमाचे मळे

हे देखील वाचा