चला हवा येऊ द्या या शो मुळे कुशल बद्रिके हे नाव प्रत्येकाच्याच परिचयाचे झाले आहे. आपल्या प्रतिभेने आणि आपल्या कॉमेडीने त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. फक्त विनोदापुरते मर्यादित न राहता त्याने विविध व्यक्तिरेखांमधून अगदी नकारात्मक भूमिका साकारून देखील त्याच्यातील सशक्त अभिनेत्याला प्रेक्षकांसमोर आणले आहे. आज तो यशाच्या शिखरावर असूनही त्याचे पाय कायम जमिनीवर असतात. कुशल जेवढा टीव्हीवर सक्रिय आहे, तेवढाच तो सोशल मीडियावर देखील कमालीचा सक्रिय आहे. त्याच्या ‘सुकून’ पोस्ट नेहमीच तुफान गाजतात आणि नेटकऱ्यांना त्या आवडतात देखील.
मुख्य म्हणजे ‘सुकून’मधून एक वेगळाच कुशल सर्वांना पाहायला, ऐकायला आणि वाचायला मिळतो. अशातच आता पुन्हा एकदा जातो त्याच्या एका पोस्टमुळे गाजतना दिसत आहे. कुशलची बायको सुनयना उत्कृष्ट कथ्थक डान्सर असून, नुकतीच ती तिच्या ‘मुघल-ए-आझम’ या महानाट्याचे दौऱ्यासाठी नाटकाच्या टीमसोबत अमेरिकेला गेली आहे. त्याच निमित्ताने कुशलने सुनयनासाठी एक पोस्ट केली आहे.
View this post on Instagram
कुशलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “यार सुनयना,
तू काय बाबा आता “अमेरिकेला” जाणार, “मुघल ए आजम” मधे, डांस बिंस करणार, पिझ्झा बर्गर खाणार , झ्याक-प्याक राहणार..
जायचं आहे तर जा, “आमाला काय…. बाबा”
खरंतर एवढे दिवस तुझ्यावाचून राहायची सवय नाही ना “घराला” म्हणून जरा काळजाला “घरं” पडल्या सारखं झालंय बस.
बाकी तू परत येशील तेंव्हां…..
हा ऋतू बदलला असेल, पाऊस, “कुणीतरी पाणी शिंपडावा” एवढाच् उरला असेल, शाळेत मुलांचे वर्ग आणि मित्र बदललेले असतील, “मनुची” हाफ पँट जाऊन फुल पँट आली असेल, “गंधूची” परीक्षा जवळ आल्यामुळे अख्ख घर अंडरप्रेशर असेल,
काय गंमत आहे बघ, कधी काळी, “आपलं सुद्धा एक घर असेल”, अशी स्वप्नं पापण्यांत घेऊन, आपण घराच्या वाटेकडे डोळे लाऊन बसायचो, आता “तुझ्या” वाटेकडे “आपलं घर” डोळे लाऊन बसेल….
आणि मी………..
मी, छोट्टीशी खोली होऊन जाईन त्या घरातली, नुसत्या भिंतींची…. तुझ्या वाचून रिकामी………. (सुकून)
तळ टिप:- तुला संधी देणाऱ्यांचे मनापासून आभार
आणि मुघलांनी अमेरिके वर कधीच राज्य केलं नाही, पण “मुघल ए आजम” ह्या तुमच्या कार्यक्रमाने अख्खी अमेरिका जिंकावी ह्या सगळ्यांना शुभेच्छा”.
कुशल बद्रिकेच्या या पोस्टवर विशाखा सुभेदार, सुरुची अडारकर, नम्रता संभेराव, विजू माने आदींनी कमेंट्स करत त्याच्या लिखाणाचे भरभरून कौतुक केले आहे. दरम्यान सुनयनाने नेहमीच कुशल साथ दिली. काळ कसाही असला तरी तिने त्याची साथ सोडली नाही. कुशलच्या या यशामध्ये सुनयनाचा देखील मोठा वाटा आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॅकलेस ड्रेसमध्ये सई ताम्हणकरचा बाेल्ड अंदाज, फाेटाे व्हायरल
सुष्मिता सेन मिस युनिव्हर्स बनण्यामागे इंदिरा गांधीचा हाेता हात, जाणून घ्या काय आहे कनेक्शन