टेलिव्हिजन स्टार आणि मॉडेल कायली जेनरने (Kylie Jenner) तिच्या स्टाईलने आणि तिच्या कामाने जगभरात लाखो चाहते कमावले आहेत. २०१९मध्ये, फोर्ब्सने कायलीला अब्जाधीश बनणारी सर्वात तरुण महिला म्हणून नाव दिले आणि आता तिच्या नावावर आणखी एक किताब जोडला गेला आहे. कायली जेनर इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोव्हर्स असलेली महिला बनली आहे. ३०० दशलक्ष चाहत्यांचा, हा जगातील सर्वात मोठा चाहता वर्ग तिने बनवला आहे.
कायली अनेकदा तिच्या लाइफस्टाइलमुळे चर्चेत असते. अगदी लहान वयातच तिने जगभरात प्रसिद्धी आणि नाव कमावले आहे. आज लाखो लोक तिला त्यांचा आयकॉन (युथ आयकॉन) मानतात. सोशल मीडियावर तिला फॉलो करणाऱ्या चाहत्यांची मोठी यादी आहे. अलीकडील अहवालानुसार, इंस्टाग्रामवर ३०० दशलक्ष फॉलोअर्स गाठणारी काइली पहिली महिला ठरली आहे. (kylie jenner becomes instagram number on celebrity with 300 million fans followers)
एरियाना ग्रांडेला सोडले मागे
इतकंच नाही, तर कायलीने पॉप स्टार एरियाना ग्रांडेला मागे टाकत ३०० मिलियनचा टप्पा गाठला आहे. त्याच वेळी, फॉलोव्हर्सच्या संख्येच्या बाबतीत बोलायचे झाले, तर सर्वात जास्त फॉलोअर्स फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोचे आहेत, ज्याची संख्या ३८८ दशलक्ष आहे. पहिल्या क्रमांकावर अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट आहे. त्याचे फॉलोअर्स ४६० दशलक्ष आहेत.
दुसरीकडे, महिलांबद्दल बोलायचे झाले तर आता या यादीत कायलीला नंबर वनचा किताब मिळाला आहे. सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. काइली तिच्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून इंटरनेटचे तापमान वाढवते.
हेही वाचा :