एकता कपूर (Ekta Kapoor) निर्मित ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा सीझन लवकरच टीव्हीवर प्रसारित होणार आहे. नवीन सीझनमध्येही प्रेक्षकांना स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय तुलसी आणि मिहिरच्या भूमिकेत दिसतील. अलीकडेच, स्मृती इराणी यांनी मालिकेत परतण्याबद्दल अधिकृत विधान देखील केले आहे.
सध्या ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. पण हे चित्रीकरण पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येत आहे. सेटवर मोबाईल फोन आणण्यास मनाई आहे. कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये म्हणून सर्व कलाकारांच्या फोनवर टेप चिकटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सेटवर काम करणाऱ्या सर्व लोकांना गोपनीयतेच्या करारावर स्वाक्षरी करायला लावण्यात आली आहे. स्मृती इराणी यांना झेड-प्लस सुरक्षा देण्यात आली आहे.
नवीन सीझनच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर, यावेळी मालिकेत कौटुंबिक भावनांसोबतच सामाजिक आणि राजकीय मुद्देही जोडले जातील. यावेळी प्रेक्षकांना मालिकेचे फक्त १५० भाग पाहायला मिळतील. २५ वर्षांपूर्वी ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ने १००० हून अधिक भाग पूर्ण केले होते. नवीन सीझन जुलैच्या मध्यात प्रसारित होईल.
स्मृती इराणी यांनी सोमवारी दिलेल्या अधिकृत निवेदनात ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेबद्दल एक खास गोष्ट सांगितली. त्या म्हणतात, ‘नवीन सीझनमध्ये योगदान देऊन मी या मालिकेच्या वारशाचा सन्मान करू इच्छिते. भारतीय सर्जनशील उद्योग मजबूत होईल असे भविष्य घडवण्यास मला मदत करायची आहे.’ या मालिकेची निर्माती एकता कपूर आहे. या मालिकेच्या निर्मितीव्यतिरिक्त, ती ‘VVAN’ आणि ‘भूत बांगला’ सारख्या चित्रपटांची निर्मिती करत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अनुष्का शर्मासोबत विम्बल्डन पाहण्यासाठी पोहोचला विराट कोहली, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
रामायणात बॉबी देओल बनणार कुंभकर्ण; जाणून घ्या संपूर्ण माहिती…