Thursday, December 4, 2025
Home अन्य कामाचा ताण इतका की सेटवरच झोपी गेला ‘हा’ दिग्गज अभिनेता, फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल

कामाचा ताण इतका की सेटवरच झोपी गेला ‘हा’ दिग्गज अभिनेता, फोटो होतोय सोशल मीडियावर व्हायरल

आमीर खान (Aamir Khan) हा हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि भूमिकांनी त्याने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आमीर खान त्याच्या भूमिकांसाठी घेतली जाणाऱ्या जिवतोड मेहनतीसाठी  ओळखला जातो. त्यामुळेच त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. सध्या आमीर खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो चित्रपटाच्या सेटवरच झोपलेला दिसत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या या चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे. आमिर खान शेवटचा 2018 मध्ये ठग्स ऑफ हिंदोस्तान चित्रपटात दिसला होता. सध्या आमिर खान लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.दरम्यान, चित्रपटाच्या दिग्दर्शक अद्वैत चंदनने आमिर खानचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो झोपलेला दिसत आहे. अद्वैतने तर आमिरला ‘कुंभकर्ण’ ही म्हटले आहे.

आमिर खान स्टारर लाल सिंग चड्ढा रिलीज होण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत, चित्रपटाचे संपूर्ण कलाकार आणि क्रू चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनच्या कामात व्यस्त आहेत.  या सगळ्यात चित्रपटाचा मुख्य अभिनेता आमिर खानही इतका व्यस्त राहतो की त्याला झोपायलाही वेळ मिळत नाही. अलीकडेच, लाल सिंग चड्ढाचे दिग्दर्शक अद्वैत चंदनने त्याच्या सोशल मीडिया पेजवर मुख्य अभिनेता आमिर खानचा एक फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये आमिर झोपलेला दिसत आहे आणि त्याच्यासोबत हिरव्या रंगाची उशीही दिसत आहे. ते पाहता, पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओमध्ये काढलेला हा फोटो आहे, जिथे आमिरने कामातून मोकळा वेळ मिळताच डुलकी घेतलेली दिसत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अव्दैत चंदनने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोसोबत त्यांनी झोपण्यातही परफेक्शनिस्ट, उठतच नाही परफेक्शनिस्ट असा मजेशीर कॅप्शन दिला आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Advait Chandan (@advaitchandan)

आमिर खान प्रॉडक्शन, किरण राव आणि वायकॉम 18 स्टुडिओज निर्मित लाल सिंग चड्ढा, यात करीना कपूर खान, मोना सिंग आणि चैतन्य अक्किनेनी देखील आहेत. हा चित्रपट फॉरेस्ट गंपचा अधिकृत रिमेक आहे. लाल सिंग चड्ढा 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे आणि काही काळापूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

हे देखील वाचा