Monday, September 14, 2026
Home बॉलीवूड सलमान, शाहरुख की आमीर खान? कोण आहे सर्वाधिक संपत्तीचा मालक? जाणून घ्या खान मंडळींची एकूण संपत्ती

सलमान, शाहरुख की आमीर खान? कोण आहे सर्वाधिक संपत्तीचा मालक? जाणून घ्या खान मंडळींची एकूण संपत्ती

बॉलिवू़ड जगतात अनेक कलाकार येतात आणि जातात, पण सिनेमा जगतातील या सर्वात मोठ्या इंडस्ट्रीवर खान मंडळींचेच निर्विवाद वर्चस्व राहिले आहे.  शाहरुख खान (Shahrukh Khan), सलमान खान (Salman Khan) आणि आमीर खान (Aamir Khan) यांच्याशिवाय या बॉलिवूड जगताचे पानही हालत नाही असेच चित्र अनेकदा पाहायला मिळते. आपल्या दमदार चित्रपटांच्या जोरावर ते या इंडस्ट्रीवर वर्षानुवर्षे राज्य करत आहेत  परंतु या दिन्ही स्टार्समध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण आहे असा प्रश्नही त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पडत असतो. जाणून घेऊया या तिनही खान मंडळींची एकूण संपत्ती आहे तरी किती.

आमिर खान, शाहरुख खान आणि सलमान खान यांनी त्यांच्या शानदार कारकिर्दीतून अमाप संपत्ती कमावली आहे.  असे म्हटले जाते की, चित्रपटांना हिट बनवण्यासाठी सलमान, शाहरुख आणि आमिरची फक्त नावेच पुरेशी आहेत आणि आजकाल हे तिन्ही कलाकार त्यांच्या आगामी चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहेत, ज्यासाठी तिन्ही कलाकारांनी मोठी रक्कम घेतली आहे. आत्तापर्यंत चाहत्यांनी त्यांच्या संपत्तीशी संबंधित अनेक अहवाल वाचले आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की त्यापैकी सर्वात श्रीमंत कोण आहे? चला तुम्हाला सांगू या तीन खानांपैकी सर्वात श्रीमंत कोण?

सलमान खान – सलमान खान  हा बॉलीवूडचा भाईजान आहे, ज्याची त्याच्या चित्रपटांसाठी 100 कोटींची कमाई ही क्षुल्लक बाब आहे. इंडस्ट्रीत सलमानचा दबदबा आहे. त्यांच्यामुळेच अनेक स्टार्स इंडस्ट्रीत येऊ शकले आहेत. सलमान खान एका छोट्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो पण या अपार्टमेंटची किंमतही करोडोंमध्ये आहे. शिवाय त्याची एकूण संपत्ती ऐकून तुमचेही डोळे पांढरे होतील. रिपोर्ट्सनुसार, सलमान खानची एकूण संपत्ती 2255 कोटी रुपये आहे.

आमीर खान –  आमीर खान चित्रपटांमध्ये त्याच्या परफेक्ट कामासाठी ओळखला जातो आणि याच कारणामुळे त्याला मिस्टर परफेक्शनिस्ट देखील म्हटले जाते. आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे, ज्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. याआधीही आमिरने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे, ज्यासाठी त्याने भरमसाट फी घेतली आहे. अशा स्थितीत आमिरनेही भरपूर संपत्ती कमावली आहे. रिपोर्ट्सनुसार, तो 1560 कोटींपेक्षा जास्त संपत्तीचा मालक आहे.

शाहरुख खान –  बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खानने या इंडस्ट्रीला अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि आताही तो त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. शाहरुखच्या चाहत्यांना त्याला भेटण्याची नेहमीच उत्सुकता असते. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी ते ‘मन्नत’  बाहेर तासनतास थांबतात. चाहत्यांचे इतके प्रेम मिळण्यासोबतच शाहरुख खानने बरीच संपत्तीही कमावली आहे. रिपोर्ट्सनुसार, किंग खान 5280 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. या रिपोर्ट्सनुसार, शाहरुख तिन्ही खानांपैकी सर्वात श्रीमंत आहे.

हे देखील वाचा