टेलिव्हिजनवरील ‘या’ दोन सह-कलाकारांनी बांधली लगीनगाठ, अभिनेत्याचे आहे दुसरे लग्न


मनोरंजन क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत, जे मालिकेत काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडतात. अनेक कलाकार त्यांचे ते प्रेम लग्नापर्यंत नेतात, काहींचे मात्र काही दिवसापर्यंत मर्यादित राहते. अशातच माहिती समोर आली आहे की, मालिकेत रोमान्स करता करता एक कलाकार जोडी कधी प्रेमात पडली हे त्यांना देखील समजले नाही. केवळ प्रेमपुरातच मर्यादित न राहता त्यांनी लग्न देखील केले आहे.

झी मराठीवर दोन वर्षांपूर्वी एक मालिका आली होती. मालिका जास्त काळ चालली नाही, परंतु या मालिकेने प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन केले. ती मालिका म्हणजे ‘लग्नाची वाइफ, वेडींगची बायकू’. मालिकेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले होते. अशातच अशी माहिती समोर आली आहे की, या मालिकेतील मदन आणि काजल म्हणजेच विजय आंदळकर आणि रुपाली झनकर यांनी लग्न केले आहे. (lagnachi wife, weddingchi bayku serial’s co-actor get married)

या गोष्टीची माहिती स्वतः अभिनेत्रीने सोशल मीडियावर दिली आहे. तिने त्याच्या लग्नाचे तसेच हळदीचे अनेक फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, रुपाली आणि विजय दोघेही खूपच सुंदर आणि खुश दिसत आहे.

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “त्याने माझे हृदय चोरले म्हणून मी त्याचे आडनाव घेतले.” फोटोमध्ये दोघेही पारंपारिक पोशाखात दिसत आहेत. अनेकजण या फोटोवर कमेंट करून त्यांच्या वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत. तसेच त्यांचे अनेक चाहते देखील या फोटोंवर कमेंट करत आहेत.

दोघांच्याही व्यावसायिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, विजय आंदळकरने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘वर्तुळ’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तसेच रुपालीची ‘लग्नाची वाइफ, वेडींगची बायकू’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते.

या मालिकेच्या सेटवरच दोघांची भेट झाली. मालिकेत ते दोघे पती-पत्नीच्या भूमिकेत होते. त्यांची जोडी अनेकांना आवडत होती. त्यांची तिथे मैत्री झाली आणि हळूहळू त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि या वर्षी त्यांनी त्यांचे हे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एप्रिल महिन्यात साखरपुडा केले. विजयचे हे दुसरे लग्न आहे. २०१७ मध्ये त्याने अभिनेत्री पूजा पुरंदरे हिच्याशी विवाह केला होता. परंतु काही कारणांनी त्याचा घटस्फोट झाला. पूजाने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेत खलनायिकेचे पात्र निभावले होते. नुकतेच तिने या मालिकेचा निरोप घेतला आहे.

हेही वाचा :

साताजन्माच्या गाठी! २०२१ मध्ये ‘या’ बॉलिवूड कलाकारांनी थाटला संसार, यादीवर टाका नजर

‘सांग तू आहेस का’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीने घेतली सप्तपदी, नव्या जीवनाला झाली सुरुवात

शिव ठाकरे आणि वीणा जगतापचे झाले ब्रेकअप? शिवच्या ‘त्या’ उत्तराने रंगली चर्चा

 


Latest Post

error: Content is protected !!