Saturday, June 29, 2024

आयपीएलवर चित्रपट येतोय…

मागील काही काळापासून बॉलिवूडमध्ये बायोपिकचे वारे वाहताना दिसत आहे. विविध दिग्गज लोकनावर आधारित अनेक दर्जेदार बायोपिक आपण मधल्या काही काळात पहिल्या. या बायोपिकच्या दुनियेत आपण क्रिकेटवर आधारित किंवा क्रिकेटशी संबधित देखील अनेक सिनेमे पाहिले आहेत. आता याच क्रिकेटवर आधारित अजून एक बायोपिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण याआधी धोनी, सचिन तेंडुलकर, कपिल देव यांच्यावर आधारित सिनेमे पाहिले आहेत आता आपण ललित मोदी यांच्यावर आधारित असणारा एक सिनेमा लवकरच मोठ्या पडद्यावर पाहणार आहोत.

ललित मोदी हे नाव जरी उच्चारले तरी सर्वात आधी डोळ्यासमोर येते ते आयपीएलचे सामने. कारण ललित मोदी यांच्या संकल्पनेतूनच आयपीएल सामन्यांचा जन्म झाला आहे. ललित मोदी यांच्यावर बनणारा बायोपिक सिनेमा हा ‘मावेरिक कमिश्नर’ या पुस्तकावर आधारित असून, विष्णूवर्धन इंदुरी या चित्रपटाची निर्माती करणार आहे. विष्णू यांनी याआधी ’83’ आणि ‘थायलवी’ आदी सिनेमे तयार केले आहेत. हे दोन्ही चित्रपट हिट ठरले. आता त्यांच्या या आगामी ललित मोदी सिनेमावर प्रेक्षकांची नजर अडकली असून सिनेमाची सर्वच उत्सुकतेने वाट बघत आहे.

विष्णू यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या बायोपिकची घोषणा केली आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले की, “’83’ वर्ल्डकप जिंकणे म्हणजेच हिमालयाचे शिखर सर करण्यासारखे होते. स्पोर्ट्स पत्रकार असणाऱ्या बोरिया मजूमदार यांच्या ‘मावेरिक कमिश्नर’ या पुस्तकात आयपीएल आणि त्यामागे असलेल्या ललित मोदी यांच्या व्यक्तिमत्वार भाष्य केले आहे. मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की आम्ही या पुस्तकावर चित्रपट बनवत आहोत.”

एका मुलाखतीमध्ये विष्णू यांनी सांगितले की, “आयपीएलने क्रिकेटचे जग कायमचेच बदलून दिले आहे. या पुस्तकात आयपीएलबद्दल अनेक लहान मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. सोबतच त्या व्यक्तीबद्दल देखील माहिती दिली आहे, जिला आयपीएलची सुरुवात झाल्यासाठी ओळखले जाते.” ललित मोदी यांच्याबद्दल सांगितले जाते की ते २०१० साली भारतातून लंडनमध्ये गेले. त्यांच्यावर मनी लॉन्डरिंगची केस चालू आहे. मात्र यावर त्यांनी ते निर्दोष असल्याचे सांगितले होते.

आयपीएलबद्दल सांगायचे झाल्यास याची सुरुवात २००८ साली केली गेली. तेव्हा या लीगमध्ये ८ टीम होत्या. आज तर या आयपीएलची क्रेझ प्रत्येक व्यक्तीच्या मनावर आहे. सध्या आयपीएलचा १५ वा सिझन चालू असून, या सामन्यांमधील अनेक कलाकारांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी देखील निवडले जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा