Monday, July 8, 2024

सुष्मिता सेनला डेट करण्यावर ललित मोदींचा मुलगा रुचिरचं वक्तव्य; म्हणाला, ‘मी अजिबात…’

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी जेव्हापासून बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनला (Sushmita Sen) डेट करत असल्याचा खुलासा केला आहे, तेव्हापासून सोशल मीडियावर वादळ आलं आहे. प्रत्येकजण या नात्यावर आपापली मते मांडत आहे. कुणाला या नात्यामागे मनी पॉवर दिसत आहे, तर कुणी त्यांची इच्छा म्हणत पाठिंबा देत आहे. 

नेटकऱ्यांकडून सुष्मिताचा एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल याचेही सांत्वन केले जात आहे. संपूर्ण सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. परंतु याउलट, ललित मोदीच्या कुटुंबाने या खुलाश्यात काहीच रस दाखवला नाही. (lalit modi dating sushmita sen his son ruchir modi reacts)

‘मी वैयक्तिक बाबींवर भाष्य करत नाही’
ललित मोदींच्या खुलाशांवर त्यांचा मुलगा रुचिर मोदीची प्रतिक्रिया समोर आली आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, रुचिर म्हणाला, “मी वैयक्तिक कौटुंबिक बाबींवर भाष्य करण्यापासून दुर राहणे पसंत करतो. परंतु व्यवसाय किंवा इतर बाबींवर भाष्य करण्यास मला आनंद होईल.”

ललित मोदींना दोन मुले आहेत. त्यापैकी एक रुचिर (२८) आणि दुसरी आलिया (२९) आहे. रुचिरने सांगितले की, ललित मोदी आणि सुष्मिताच्या नात्याबद्दल त्याला आणि त्याच्या कुटुंबाला माहिती आहे, परंतु त्यांना कुटुंबातील इतर सदस्यांच्या वैयक्तिक गोष्टींवर चर्चा करणे आवडत नाही.

रुचिर मोदी त्याचे वडील ललित मोदींसोबत लंडनमध्ये राहतो. त्याची बहीण आलिया विवाहित आहे, पण ती सिंगल आहे. डिसेंबर २०१८ मध्ये त्यांनी त्यांची आई मीनल गमावली. त्या वेळी ललित मोदींनी त्यांना श्रद्धांजली देणारी पोस्ट देखील शेअर केली होती. मीनल ललितपेक्षा ११ वर्षांनी मोठ्या होत्या.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा