Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड स्वरकोकीळा लता मंगेशकर यांच्या अस्थींचे नाशिकच्या पवित्र रामकुंडात झाले विसर्जन

स्वरकोकीळा लता मंगेशकर यांच्या अस्थींचे नाशिकच्या पवित्र रामकुंडात झाले विसर्जन

भारतरत्न स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईत वयाच्या ९३ व्या वर्षी दुःखद निधन झाले. तब्बल सात दशकं लता मंगेशकर यांनी भारतीय संगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या शांत आणि प्रेमळ आवाजाने त्यांनी जगातील सर्वच प्रेक्षकांच्या मनात जागा मिळवली होती. लता मंगेशकर यांच्या निधनाने एका सुरेल युगाचा अंत झाला. सोमवारी (७ फेब्रुवारी) रोजी लता दीदींच्या अस्थी त्यांच्या भाचा असलेल्या आदिनाथ मंगेशकर यांच्याकडे सोपवण्यात आल्या होत्या. त्यांच्या अस्थींचे तीन कलश मंगेशकर कुटुंबियांना देण्यात आले. आज (१० फेब्रुवारी) रोजी लता मंगेशकर यांच्या अस्थींचे नाशिकमध्ये विसर्जन कऱण्यात आले.

लता दीदींचे भाचे असणाऱ्या आदिनाथ मंगेशकर यांनी नाशिकला जाऊन थेतील पवित्र अशा रामकुंडामध्ये दीदींच्या अस्थींचे विसर्जन केले गेले. आदिनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या स्व हस्ते अस्थींचे विसर्जन केले. या अस्थी विसर्जनावेळी नाशिकमध्ये उषा मंगेशकरांसह मंगेशकर कुटुंबातील इतरही सदस्य हजर होते. याशिवाय शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी आणि लता दीदींचे चाहते मोठ्या संख्येने हजर होते.

प्राप्त माहितीनुसार लता मंगेशकर यांच्या अस्थींचे विसर्जन नाशिकसोबतच काशीतील गंगेत आणि हरिद्वारमध्येही केले जाणार आहे. जेव्हा दीदींच्या अस्थी दिल्या गेल्या, तेव्हाच त्या तीन कलशांमध्ये देण्यात आल्या होत्या. मात्र मंगेशकर कुटुंबीयांकडून याबाबत अद्याप काहीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. लता मंगेशकर यांच्या निधनाचे दुःख संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही व्यक्त केले असून, गुटेरेस यांचे प्रवक्ते फरहान हक म्हणाले की, लता मंगेशकर यांचा आवाज भारतीय उपखंडाचा आवाज होता. गुटेरेस त्यांचे कुटुंबीय, नागरिक आणि भारत सरकारप्रति संवेदना व्यक्त करत आहेत. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहंमद सोलिह यांनीही शोकसंदेश पाठवला आहे.

लता मंगेशकर यांनी खूपच संघर्ष करून हे एवढे आभाळ एवढे यश संपादन केले. त्यांचे कर्तृत्व इतके महान, मोठे होते आणि त्यांचा आवाज इतका सुरेल होता की, त्यांना देवी सरस्वतीची उपमा दिली जायची.

हेही वाचा :

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा