Friday, June 13, 2025
Home बॉलीवूड जगातल्या 200 सर्वोत्कृष्ट गायकांमध्ये लता दीदींचा समावेश, बहुमान मिळालेल्या दीदी ठरल्या एकमेव भारतीय

जगातल्या 200 सर्वोत्कृष्ट गायकांमध्ये लता दीदींचा समावेश, बहुमान मिळालेल्या दीदी ठरल्या एकमेव भारतीय

लता मंगेशकर यांचे नाव उच्चारले तरी मनात भाव येतात ‘बस नाम ही काफी है’. या दोन शब्दात सर्व काही सामावले आहे. आज असा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही ज्याने लता मंगेशकर हे नाव ऐकले नसेल आणि त्यांची गाणी ऐकली नसतील. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात लता मंगेशकर हे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल. आज जरी दीदी आपल्यामध्ये नसतील तरी त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, आणि त्यांच्या गाण्यांच्या रूपातून त्या सदैव आपल्या सोबत राहतील. आज लता दीदी आपल्यामध्ये नसल्या तरी त्यांना एक सर्वात मोठा सन्मान मिळाला आहे.

lata mangeshkar

अमेरिकेमधील सांस्कृतिक मासिक असलेल्या ‘रोलिंग स्टोन’ने “200 बेस्ट सिंगर ऑफ ऑल टाइम” याची एक यादी जाहीर केली आहे. या यादीत लता मंगेशकर यांना स्थान मिळाले असून त्या हे स्थान मिळवणाऱ्या एकमेव भारतीय ठरल्या आहेत. लता मंगेशकर यांना या यादीत 84 वे स्थान देण्यात आले आहे. या मासिकाने लता दीदींना स्थान देताना सांगितले की, “द मेलडी क्वीन’ लता मंगेशकर यांचा अतिशय श्रवणीय आवाज भारतीय संगीताचा आधारस्तंभ आहे. याचा प्रभाव बॉलिवूड चित्रपटांमार्फत संपूर्ण जगावर पसरला आहे. त्यांनी गायलेल्या गाण्यांचा काळ हा भारतासाठी सुवर्णकाळ होता. त्यानी 7000पेक्षा अधिक गाणी गेली आहेत.”

या मासिकाने लता मंगेशकर यांच्यासोबतच एरेथा फ्रँकलिन, व्हिटनी ह्यूस्टन, सॅम कुक, बिली हॉलिडे, मारिया केरी, रे चार्ल्स, स्टीवी वंडर, बियॉन्से, ओटिस रेडिंग, अल ग्रीन, लिटिल रिचर्ड, जॉन लेनन, पैटसी क्लाइन, फ्रेडी मर्करी, बॉब डायलन, प्रिंस, एल्विस प्रेस्ली, सेलिया क्रूज, फ्रॅंक सिनात्रा, मार्विन गे आदी गायकांना स्थान दिले आहेत. याशिवाय पाकिस्तानी गायक असलेले नुसरत फतेह अली खान 91 व्या स्थानी आहेत. तत्पूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये लता मंगेशकर यांनी अंतिम श्वास घेतला आणि एका पर्वाचा अंत झाला. (lata mangeshkar features in 200 best singers in world)

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकमेकांना भाऊ- बहीण मानणाऱ्या लता मंगेशकर आणि दिलीप कुमारांमध्ये ‘या’ कारणाने आला होता दुरावा, 13 वर्षे…

जेव्हा राज कपूर यांनी लता मंगेशकरांना म्हटलं होतं, ‘कुरूप’ मुलगी; मग ‘गानकोकिळे’नंही घेतला होता मोठा निर्णय

हे देखील वाचा