Friday, February 3, 2023

एकमेकांना भाऊ- बहीण मानणाऱ्या लता मंगेशकर आणि दिलीप कुमारांमध्ये ‘या’ कारणाने आला होता दुरावा, १३ वर्षे…

गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि अभिनेते दिलीप कुमार ही भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व आहेत. दोघांनीही आपल्या असामान्य कर्तृत्वाने असंख्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. दोघांची कार्यक्षेत्रे वेगवेगळी असली, तरी त्यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. असं म्हणतात की, दिलीप कुमार लता मंगेशकरांना आपली छोटी बहीण मानत होते.

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांनी 60 च्या दशकात आपल्या बहारदार अभिनयाने चाहत्यांना वेड लावले होते. ‘ज्वार भाटा’ चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याचप्रमाणे सुरांची सम्राज्ञी समजल्या जाणाऱ्या लोकप्रिय गायिका लता मंगेशकर यांना ते आपली छोटी बहीण मानत होते.

माध्यमांतील वृत्तांनुसार, लता मंगेशकर त्यांना राखीही बांधत होत्या. मात्र, एकवेळ अशीही आली की, एकमेकांना भाऊ बहीण मानणाऱ्या लता मंगेशकर आणि दिलीप कुमारांनी एकमेकांशी बोलणही बंद केले होते. ते 1,2 वर्षे नाही, तर जवळपास 13 वर्ष एकमेकांशी बोलले नव्हते.

सन 1957 मध्ये ‘मुसाफिर’ हा चित्रपट आला होता. माध्यमांतील वृत्तांनुसार, यामधील ‘लागी नाहीं छूटे’ गाण्यासाठी सलील चौधरी यांनी दिलीप कुमारांची निवड केली होती. परंतु या गाण्यासाठी आवाज देणाऱ्या लता मंगेशकरांना याबद्दल कल्पना नव्हती. ज्यावेळी त्यांना याबद्दल समजले, तेव्हा त्या दिलीप गाणे गाऊ शकेल का याबद्दल विचार करू लागल्या. इकडे दिलीप कुमार गाण्याच्या तयारीला लागले. मात्र, प्रत्यक्ष रेकॉर्डिंगवेळी लता मंगेशकरांसोबत गाणे गाताना ते घाबरत होते.

हेही पाहा- अभिनेता शाहिद कपूरला आहेत 3 आई आणि 3 बाप

सलील यांनी दिलीप कुमारांची भिती घालवण्यासाठी त्यांना ब्रँडीचा पेगही पाजला होता. ज्यानंतर त्यांनी गाणे गायले. परंतु आवाज बरोबर जुळला नाही.

यावेळी लता मंगेशकरांनी मात्र नेहमीसारखचं सुरेख गाणे गायले. माध्यमांतील वृत्तांनुसार, या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतरच दिलीप कुमार आणि लता मंगेशकरांमध्ये मतभेद सुरू झाले होते. असे म्हणतात की, दोघेही तब्बल 13 वर्षे एकमेकांशी बोलले नव्हते. त्यानंतर1970 मध्ये त्यांच्यातील मतभेद संपले. नंतर लता मंगेशकरांनी दिलीप कुमारांना राखी बांधण्यास सुरुवात केली.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
बंगाली अभिनेत्रीमुळे मिळाला बॉलिवूडचा पहिला ‘ग्लॅमर’ चेहरा! दिलीप कुमार यांच्याशी होते खास नाते
जेव्हा ‘या’ अभिनेत्याच्या लग्नाच्या वरातीत एकत्र पोहचले राज कपूर-दिलीप कुमार, अनसीन फोटो व्हायरल

हे देखील वाचा