Thursday, November 21, 2024
Home अन्य शेतकरी आंदोलनात गान कोकिळा लता मंगेशकर यांची उडी, पॉप स्टार रिहानाच्या ट्विटला दिले प्रत्युत्तर; म्हणाल्या…

शेतकरी आंदोलनात गान कोकिळा लता मंगेशकर यांची उडी, पॉप स्टार रिहानाच्या ट्विटला दिले प्रत्युत्तर; म्हणाल्या…

मागील ७२ दिवसांपासून दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे परत घ्यावेत, या मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. याच आंदोलनाबद्दल भारताबाहेरच्या अनेक व्यक्तींनी त्यांची मते व्यक्त केली आहे. त्यातही पॉप स्टार रिहाना हीच्या बाबत सध्या सर्वाधिक चर्चा सुरू आहे.

जगप्रसिद्ध पॉप सिंगर रिहानाने नुकतेच एक ट्विट करत भारतातील शेतकरी आंदोलनावर ‘आपण ह्या विषयावर का नाही बोलत’ असा प्रश्न विचारला. तिच्या ट्विटनंतर अनेक आंतराष्ट्रीय स्तरावरील लोकांनी या आंदोलनावर भाष्य करायला सुरुवात केली. मात्र, यानंतर भारतात एक वेगळा सुर उमटू लागला आहे. तो म्हणजे परदेशातील लोकांनी यावर अधिक काय ते बोलू नये.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी सोबतच क्रीडा जगतातील खेळाडूंनी रिहानाच्या ट्विटला उत्तर देताना ‘हा आमच्या देशाचा अंतर्गत मुद्दा असल्याने बाहेरच्या व्यक्तींनी यात बोलू नये’ अशा अक्षयचे ट्विट केले. यात अजय देवगण, अक्षय कुमार, सुनील शेट्टी, एकता कपूर, विराट कोहली, सचिन तेंडुलकर, कंगना राणावत अशा लोकांचा समावेश आहे.

त्यात आता लता मंगेशकर यांनी देखील एक ट्विट करत रिहानाला प्रत्युत्तर दिले आहे. लता मंगेशकर यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, “भारत हा खूप महान देश आहे, आणि आम्हा सर्व भारतीयांना याचा अभिमान आहे. या अभिमानस्पद भारतीयाच्या नात्याने मला विश्वास आहे की, कोणतीही समस्या, कोणताही मुद्दा ज्याचा आम्ही देश या नात्याने सामना करत आहोत. त्या आम्ही आमच्या देशातील लोकांचे हित लक्षात ठेऊन सहृदयाने सोडवण्यासाठी सक्षम आहोत. जय हिंद”

विराट कोहलीने देखील ट्विट करत म्हटले की, ‘आपण सर्व या काळात एकत्र राहूया. शेतकरी आपल्या देशाचा एक अविभाज्य घटक आहे. मी आश्वस्त आहे की, शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्व पक्ष एकत्र येउन एका चांगला उपाय यावर शोधून काढतील.’

तर अजिंक्य रहाणेने लिहिले, “जर आपण सर्व देशवासी एकत्र असू तर असा कोणताच मुद्दा नाही, ज्यावर आपण उपाय शोधू शकत नाही.”

या सर्वानी त्यांच्या ट्विट मध्ये #IndiaTogether असा हॅशटॅग वापरला आहे.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा