आपल्या ७० वर्षाच्या लांबलचक करिअरमध्ये गानकोकिळा लता मंगेशकर यांनी अनेक सुंदर आणि मंत्र मुग्ध करणारी गाणी गायली आहेत. परंतु त्यांनी जगाचा निरोप घेतल्यामुळे सगळेच त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. अनेकजण त्यांची गाणी, जुने फोटो आणि किस्से शेअर करून त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत आहेत. तसेच संपूर्ण देशातून तसेच विदेशातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अशातच त्यांचा एक जुना व्हिडिओ जोरदार चर्चेत आला आहे. जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे.
एका मुलाखतीत लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी सांगितले होते की, “माझे आणि आशाचे बिना म्युझिक काहीच होऊ शकत नव्हते. संगीत दिग्दर्शकांना असे वाटत होते की, आम्ही गावे.” यासोबतच लताजींनी या गोष्टीचा खुलासा केला की, जुनी अभिनेत्री मधुबाला ही कोणताही चित्रपट साईन करताना तिच्या काँट्रॅक्टमध्ये लिहीत होती की, तिच्या चित्रपटांना लता मंगेशकर यांनीच गाणे गायले पाहिजे. (Lata Mangeshkar once said there can be no music without me and asha throwback video viral)
बॉलिवूड अभिनेत्री मधुबालाचा १९६० मध्ये आलेल्या ‘मुगल – ए – आजम’ हा चित्रपट खूप गाजला होता. त्यातील गाण्यांनी तर प्रेक्षकांना अगदी वेड लावले होते. यातील बहुतांश गाणी लता मंगेशकर यांनी गायली होती. यात ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘मोरे पनघट पे’, ‘तेरी मेहफिल मे’ आणि ‘मोहब्बत की झुठी कहाणी’ या गाण्यांचा समावेश होतो. लतादीदी आज जरी या जगातून गेल्या असल्या, तरी देखील त्यांच्या गाण्यांच्या रूपाने त्या नेहमीच आपल्यात अजरामर राहणार आहेत.
हेही वाचा :