Thursday, February 22, 2024

लता मंगेशकर यांच्या जादुई आवाजाने भोजपुरी भाषेतील ‘या’ गाण्यांना देखील चढवला सुरेल साज

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाच्या वृत्ताने आज देशभर शोककळा पसरली आहे. गेली महिनाभर त्यांच्या आजारपणाबद्दल बातम्या समोर येत होत्या. मात्र मुंबई च्या ब्रीच कॅन्डी रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गानसम्राज्ञी लता मंगेशकर या भारतीय संगीत क्षेत्रातील असामान्य व्यक्ति होत्या. त्याच्या जादुई आवाजाने संगीत क्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी तब्बल 36 भाषांमध्ये गाणी गायली आहेत. भोजपुरी चित्रपटातील त्यांनी गायलेली गाणी प्रचंड गाजली होती. पाहूया त्यांची गाजलेली काही भोजपुरी गीते.

हे गंगा मइया तोहे पियरी चढ़इबो, सइंया से करा द मिलनवा हे राम-
या गाण्याचा इतिहास खूपच रंजक आहे. कारण हे गाणे भोजपुरी सिनेसृष्टीतील पहिल्या चित्रपटातील गाणे आहे. या गाण्याला लता मंगेशकर यांचा आवाज लाभला होता.’हे गंगा मइया तोहे पियरी चढ़इबो, सइंया से करा द मिलनवा हे राम’हा चित्रपट आणि यामधील गाणी खूपच लोकप्रिय ठरली होती.

लाली लाली होठवा से बरसे ललईया हो कि रस चुएला-
लता मंगेशकर यांचे भोजपुरी गीतांमधील हे एक प्रसिद्ध गाणे होते. हे गाणे ‘लगी छुटे राम का’ चित्रपटातील आहे. लता दीदींच्या आवाजाने ते खूपच लोकप्रिय ठरले होते.

लुक छिप बदरा में –

हे गाणे सुद्धाहे ‘गंगा मइया तोहे पियरी चढ़इबो, सइंया से करा द मिलनवा हे राम’ चित्रपटातील आहे. ज्याला लता मंगेशकर यांनी गायले होते. या चित्रपटातील सर्वच गाणी लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे लोकप्रिय ठरली होती.

उमरिया कइली तोहरे नाम –

हे गाणे लता मंगेशकर यांचे पहिले भोजपुरी होते. हे गाणे आजही लोकप्रिय आहे. लता मंगेशकर यांच्या जादूई आवाजाने हे गाणे सुपरहीट ठरले होते.

आज लता मंगेशकर यांच्या निधनाने संपुर्ण संगीत क्षेत्रात शोककळा पसरली असून देशातील सर्व दिग्गज व्यक्तींनी याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा