Friday, November 22, 2024
Home कॅलेंडर लता मंगेशकर अनंतात विलीन! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी घेतले अंत्यदर्शन; वाचा दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर | RIP Lata Mangeshkar

लता मंगेशकर अनंतात विलीन! शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी घेतले अंत्यदर्शन; वाचा दिवसभरातील घडामोडी एका क्लिकवर | RIP Lata Mangeshkar

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी (६ फेब्रवारी) सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लतादिदींना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. ३० जानेवारी रोजी लता मंगेशकर कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि पुढे उपारादरम्यान त्यांचे निधन झाले. (Lata Mangeshkar Live Updates)

Remembering Lata Mangeshkar Live | लता मंगेशकर अनंतात विलीन

आपल्या जादूई आवाजाने गेली सहा दशके श्रोत्यांना अमृतवाणीची अनुभूती देणाऱ्या लतादिदी यांचा शिवाजी पार्क येथे अंत्यविधी करण्यात आला. लतादिदींच्या चेहऱ्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी प्रभूकुंज (दिदींचे घर) ते शिवाजी पार्क असे रस्त्याच्या दुतर्फा चाहत्यांची गर्दी लोटल्याचे पाहायला मिळाले.

कला, क्रिडा, साहित्य यासह राजकीय, सहकार, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी ‘लता मंगेशकर अमर रहे’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला होता. अशा शोकमग्न वातावरणात भारतरत्न लता मंगेशकर यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

बरोबर संध्याकाळी ७ वाजून १६ मिनिटांनी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी लता दीदींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी मंगेशकर कुटुंबीयांसह उपस्थित संपूर्ण जनसमुदायासह आणि अवघा देश शोकसागरात बुडाला होता.

  • लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मंगेशकर कुटुंबियांना धीर देत त्यांचे सांत्वन केले.

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर, श्रद्धा कपूर, शाहरुख खान, आमिर खान या सिनेसृष्टीतील दिग्गजांसह, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.

लता मंगेशकर यांच्या निधनावर दिग्गजांच्या शोकमग्न प्रतिक्रिया….

  • लतादिदी यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे – देवेंद्र फडणवीस
  • पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल… लतादींदींच्या अंत्यसंस्काराच्या तयारीचा आढावा… शिवाजी पार्कवर पार पडणार अंत्यसंस्कार
  • लता दीदींनी भारतीय संगीत समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवलं – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून दुःख व्यक्त
  • भारतरत्न लता मंगेशकर यांच्या अखेरच्या प्रवासाची तयारी सुरु..शिवाजी पार्कात होणार दीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार..दीदींच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
  • लता दीदींच्या निधनाची बातमी सर्वांसाठी अत्यंत हृदयद्रावक असल्याची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली शोकभावना
  • लता मंगेशकर यांच्या अंतिम संस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत… पंतप्रधान मोदी ४ वाजता मुंबईत उपस्थित राहणार आहेत… पंतप्रधान मोदी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवाजी पार्कमध्ये येणार
  • लता दीदींच्या जाण्यानं एका स्वरयुगाचा अंत झाला असून, एक महान पर्व संपलं – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
  • लता मंगेशकर यांच्या निधनाने २ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर.. वयाच्या ९३ व्या वर्षी लता मंगेशकर यांचं निधन… भारतात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा.. अर्धा झुकणार तिरंगा
  • लतादीदींच्या जाण्याने देशात कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना
  • लतादीदींनी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी घेतला अखेरचा श्वास…. डॉक्टारांची माहिती

हेही वाचा – भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अश्रू अनावर; म्हणाले, ‘दिदी तुम्ही…’

लता मंगेशकर यांचा जीवनप्रवास…

मास्टर दिनानाथ मंगेशकर आणि शेवंती मंगेशकर या दांपत्याच्या घरात इंदौर येथे दिनांक २८ सप्टेंबर १९२९ रोजी लता मंगेशकर यांचा जन्म झाला. अगदी लहान वयापासूनच लतादिदींनी गायकीला सुरुवात केली. पुढे अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमातून आणि नंतर बॉलिवूड, मराठी या सिनेक्षेत्रासह अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या गोड आवाजाने कोट्यवधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

अनेक दशके त्यांनी आपल्या मधूर आवाजाने रसिकांची मने जिंकली नव्हे तर त्यांच्या मनावर राज्य केले. लता मंगेशकर यांनी त्यांच्या जीवनात हजारो गाणी गायली, ज्यातील काही गाणी लतादिदींप्रमाणेच अजरामर आहेत. लतादिदींनी अगदी लहानपणापासूनच संगीत हेच आपले आयुष्य बनवले. संगीत, जे कधी आपल्याला हसवते तर कधी आपल्या डोळ्यातून अश्रु आणते. अशा दोन्ही आवाजांची देणगी लता मंगेशकर यांना लाभली होती.

अधिक वाचा –

…म्हणून दिलीप कुमार अन् लता दीदींमध्ये झाले मतभेद, तब्बल ‘इतकी’ वर्षे होता नात्यात अबोला

‘त्या’ व्यक्तीमुळे लता दीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहित, ‘अशी’ आहे त्यांची अपुरी प्रेमकहाणी

जेव्हा राज कपूर यांनी लता मंगेशकरांना म्हटलं होतं, ‘कुरूप’ मुलगी; मग ‘गानकोकिळे’नंही घेतला होता मोठा निर्णय

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा