Thursday, March 28, 2024

‘त्या’ व्यक्तीमुळे लता दीदी आयुष्यभर राहिल्या अविवाहित, ‘अशी’ आहे त्यांची अपुरी प्रेमकहाणी

सुरांची देवता, संगीतातील कोकिळा लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक सुपरहिट गाणी सिनेसृष्टीमध्ये गायली. मराठीसह ३६ भारतीय भाषांच्या गाण्यांमध्ये त्यांनी आपला आवाज दिला आहे. लता दीदींनी आजवर अनेक पुरस्कार देखील जिंकले आहेत. साल १९८९ मध्ये त्यांनी दादा साहेब फाळके पुरस्कार जिंकला होता. तसेच भारताचा सर्वोत्तम नागरिक म्हणून त्यांना भारतरत्न या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.

लता दीदींनी आजवर लग्न केले नाही. अनेक चाहत्यांच्या मनामध्ये त्यांनी लग्न का केले नाही? असा प्रश्न एकदा तरी नक्कीच आला असेल. परंतु तुम्हाला माहीत आहे का. लता दीदी देखील एका मुलाच्या प्रेमात होत्या. आज जाणून घेऊयात त्यांची प्रेम कहाणी. (Why Lata Mangeshka remained a unmarried know reason)

डूंगरपुर राजघराण्यातील महाराजा राज सिंग लता दीदींना खूप आवडायचे. राज यांना देखील लता दीदी आवडत होत्या. दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. परंतु त्यांच्या प्रेमाची गाडी लग्नापर्यंत पोहचली नाही.

राज हे एका राजघराण्यातील होते. तसेच त्यांनी त्यांच्या आई वडिलांना शब्द दिला होता की ते कधीही सामान्य घराण्यातील मुलीबरोबर विवाह करणार नाही. त्यांनी त्यांचा हा शब्द शेवटच्या श्वासापर्यंत पाळला.

राज लता दीदींपेक्षा ६ वर्षे मोठे होते. ते लता दीदींना प्रेमाने ‘मिठू’ म्हणायचे. जेव्हा जेव्हा ते लता दीदींना भेटायला यायचे तेव्हा तेव्हा त्यांच्या जवळ एक टेप रेकॉर्डर असायचा. ज्यामध्ये ते लता मंगेशकरांची निवडक लोकप्रिय गाणी रेकॉर्ड करून ठेवायचे. लता दीदींचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांची राज यांच्या बरोबर चांगली मैत्री होती. ते नेहमी त्यांच्या घरी यायचे. त्याच दरम्यान लता दीदी राज यांच्या प्रेमात पडल्या होत्या.

आई वडिलांना वचन दिल्याप्रमाणे राज यांनी सामान्य घरातील मुलीबरोबर लग्न केले नाही. पण त्यांनी आयुष्यभर लग्नच नाही केले. त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. त्यामुळे ते काही वर्षे बीसीसीआय बरोबर देखील जोडलेले होते. अखेर १२ सप्टेंबर २००९ मध्ये त्यांची प्राण ज्योत मालवली.

याच कारणामुळे लता दीदींनी देखील कधीच लग्न नाही केले. तसेच त्यांच्या भावंडांमध्ये त्या मोठ्या होत्या. वडिलांचे लवकर निधन झाल्यामुळे त्यांच्यावरच संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. आपल्या लहान भावंडांचे शिक्षण पूर्ण व्हावे म्हणून त्यांनी स्वतःचे शिक्षण सोडून दिले. मराठी संगीताची शिकवण त्यांना लहापणापासूनच वडिलांकडून मिळाली होती. सुरुवातीच्या काळात वडील नसताना पैशांची कमतरता भासत असल्याने त्यांनी अभिनय देखील केला. ही सर्व कारणे त्यांचे अविवाहित असण्याला जबाबदार आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा