Monday, July 1, 2024

गायिकी आधीच लतादीदींनी ठेवले होते अभिनयात पाऊल, बोनी कपूर यांच्या ‘या’ चित्रपटात झळकल्या होत्या गानकोकिळा

सप्तसुरांवर राज्य करणाऱ्या आणि भारतरत्न प्राप्त करणाऱ्या लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत. गेल्या वर्षी 6 फेब्रुवारीला लता मंगेशकर यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने प्रत्येकाचे डोळे पणवले हाेते. त्या जरी आपल्यात नसल्या तरी देखील त्यांनी गाण्यांनी आपल्याला आयुष्य भरासाठी एक खूप मोठी देणगी दिली आहे. त्यांनी त्यांच्या करीअरमध्ये अनेक गाणी गाऊन प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

त्यांनी बॉलिवूडमध्ये एका पेक्षा एक सुपरहिट गाणी गायली आहे. परंतु खूप कमी लोकांना ही गोष्ट माहीत असेल की, गायनासोबत लता मंगेशकर यांनी (Lata Mangeshkar) त्यांच्या करीअरमध्ये अभिनय देखील केला आहे. त्यांनी मोठ्या पडद्यावर अभिनय केला आहे. लता मंगेशकर यांनी बोनी कपूर यांच्या एका चित्रपटात अभिनय केला आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्या अभिनयाबद्दल काही गोष्टी. ( Lata Mangeshkar was seen in boney Kapoor’s film, did you see that film )

लता मंगेशकर यांनी बोनी कपूर यांच्या ‘पुकार’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात एक गाणे आहे. ‘एक तू ही भरोसा’ हे गाणे शाळेतील मुलांनी प्रार्थना केली आहे, यावर चित्रित करण्यात आले होते. ज्यात लता मंगेशकर देखील होत्या. या गाण्यात त्या अभिनय करताना दिसल्या होत्या. त्यांच्या अभिनयाला देखील लोक आता खूप पसंती दर्शवत आहेत. या चित्रपटात पहिल्यांदा लता दीदी पडद्यावर दिसल्या होत्या.

लता दीदींना गाण्याची आणि अभिनयाची आवड लहानपणापासूनच होती. यामुळेच खूप कमी वयात त्यांच्या वडीलांसोबत त्या संगीत आणि अभिनयाशी जोडल्या गेल्या होत्या. एकदा लतादीदींच्या वडिलांनी ‘भाव बंधन’ या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. या नाटकात लतादीदींनी लतिका नावाचे पात्र निभावले होते. गायक बनाण्या आधीच लता मंगेशकर यांनी अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले होते.

लता मंगेशकर या 13 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या डोक्यावरील त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. त्यामुळे त्यांच्या 5 भावंडांची जबाबदारी त्यांच्यावर आली. त्यांनी वयाच्या 13 व्या वर्षी 1942 मध्ये आलेल्या ‘पहली मंगलागौर’ या चित्रपटात काम केले होते. काही चित्रपटात त्यांनी अभिनेता आणि अभिनेत्रीच्या बहिणीचे पात्र देखील निभावले आहे. माध्यमातील वृत्तानुसार त्यांनी 1942ते 1947 पर्यंत तब्बल 8 चित्रपटात काम केले आहे.

लता मंगेशकर जेव्हा गायन क्षेत्रात पुढे आल्या तेव्हा सुरुवातीला अनेकवेळा त्यांना नकार पचवावा लागला आहे. परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी 36 भाषांमध्ये 50 हजारापेक्षाही जास्त गाणी गायली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
लता दीदी अन् मोहम्मद रफींमध्ये असे काय झाले होते की, तब्बल 4 वर्षे गायले नव्हते एकत्र गाणे

जगातल्या 200 सर्वोत्कृष्ट गायकांमध्ये लता दीदींचा समावेश, बहुमान मिळालेल्या दीदी ठरल्या एकमेव भारतीय

हे देखील वाचा