२०२० वर्षाने सर्वांचं अनेक वाईट घटना दाखवल्या. कलाकारांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांसाठीच हे वर्ष काळे ठरले. या वर्षाने अनेक चांगल्या कलाकारांना देखील आपण कायमचेच गमावले. त्यातलेच एक म्हणजे संगीतकार वाजिद खान. संगीत क्षेत्रातील मोठे नाव असणारी साजिद-वाजिद यांची जोडी वाजिद खान यांच्या जाण्याने तुटली. वाजिद खान जाऊन ६ महिने पूर्ण होत असतांना वाजिद यांच्या पत्नीने कमलरूखने खान परिवारावर अनेक गंभीर आरोप लावले आहे.
वाजिद खान यांचे याचवर्षी १ जून २०२० ला निधन झाले. त्यांच्या निधनानंतर काही महिन्यांनी कमलरूख यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर करत खान कुटुंबावर धर्म परिवर्तनासाठी दबाब टाकत असल्याचा खळबळजनक खुलासा केला.
आता कमलरूख यांनी एक मुलाखत दिली असून त्यात त्यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘ मी आणि वाजिद लग्नाआधी १० वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. त्यानंतर आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. मी पारसी आणि वाजिद मुस्लिम असल्याने आम्ही लग्न सुद्धा एका खास कायद्याअंतर्गत केले. लग्नानंतर काही महिने ठिक गेले. मात्र काही महिन्यांनी वाजिद यांनी माझ्यावर धर्म परिवर्तनासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. मी जर धर्म बदलला नाही तर मला वाजिद यांनी घटस्फोट देण्याची धमकी दिली. त्यांनी २०१४ साली घटस्फोटासाठी अर्ज देखील केला होता, परंतु तो अर्ज नाकारण्यात आला. त्यानंतर आम्ही वेगवेगळे राहू लागलो. मी धर्म परिवर्तनाला नकार देत असल्याने आमचे पती पत्नीचे नाते देखील संपले होते, इतकेच काय तर माझ्या मुलांचे वडील सुद्धा होऊ शकले नाही. काही काळाने वाजिद यांनी माझी माफी मागितली. आमच्यात सर्व काही सुरळीत होण्याआधीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. वाजिद यांच्या निधनानंतर कमलरूख यांनी वाजिद यांच्या परिवारावर धर्म बदलण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. शिवाय खान कुटुंबाने माझी संपत्ती देखील हडप केल्याचे त्यानी सांगितले आहे.’
तत्पूर्वी साजिद – वाजिद या जोडीने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांना संगीत दिले होते. त्यात दबंग सीरीज, पागलपंती, हीरोपंती, मैं तेरा हीरो, जुड़वा 2, चश्मे बद्दूर, हिम्मतवाला, एक था टाइगर, हाउसफुल 2, वीर, वान्टेड, गॉड तुस्सी ग्रेट हो, वेलकम, पार्टनर, मुझसे शादी करोगी, तेरे नाम, हम तुम्हारे हैं सनम, हॅलो ब्रदर यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.