Wednesday, June 26, 2024

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ‘या’ चित्रपटात केले होते 1 रुपयात काम, वाचा संपूर्ण कहाणी

मराठी सिनेसृष्टीत असे अनेक अव्वल कलाकार होऊन गेले ज्यांनी त्यांच्या अभिनयाने सगळ्यांचे मनोरंजन केले आहे. यातीलच एक नाव म्हणजे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे. ‘लक्षा लक्षा’ म्हणत आख्या महाराष्ट्राने त्यांना डोक्यावर घेतले. त्यांच्या अभिनयाचे कौतुक केले. त्यांच्या चौकस बुद्धीने सगळेच प्रेक्षक मोहित झाले होते. आज जरी ते आपल्यात नसले, तरी देखील त्यांच्या अभिनयाची चर्चा सर्वत्र आहे. त्यांच्या बाबत आपण आजपर्यंत अनेक कहाणी ऐकल्या आहेत. आज आपण त्यांच्याबाबत एक मजेशीर किस्सा वाचणार आहोत. तो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एका चित्रपटात चक्क 1 रुपयात काम केले होते.

अभिनेते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांना नेहमीच विशेष स्थान असायचे. महेश कोठारे यांनी अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. परंतु ही तेव्हाच गोष्ट आहे जेव्हा त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते आणि त्यांनी पहिला चित्रपट बनवला होता. त्यावेळी चित्रपट बनवण्यासाठी त्यांचे बजेट खूपच कमी होते. चित्रपटाची आयडिया डोक्यात येताच त्यांनी ही कथा लक्ष्मीकांत बेर्डे यांना ऐकवली. त्यांना देखील चित्रपटाची कहाणी खूप आवडली होती. (Laxmikant Berde do work in film just in one rupees, read full story)

त्यावेळी हिंदी चित्रपट ‘प्यार किये जा’ हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटाचा मराठी रिमेक महेश कोठारे यांनी करायचा होते. या कथेचे नाटक देखील करण्यात आले होते. नाटकातील कलाकार बबन प्रभुणे यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या जागी लक्ष्मीकांत बेर्डे यांना घेण्यात आले.

महेश कोठारे यांनी जेव्हा हे नाटक पाहिले, तेव्हा त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अनुभव खूप आवडला होता. तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांना मेहमुदच्या भूमिकेसाठी त्यांची निवड केली. त्यावेळी महेश कोठारे यांच्याकडे पैसे नव्हते. त्यावेळी त्यांनी खिशातून एक रुपया काढला आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हातात ठेवला. तो पहिला चित्रपट होता धूमधडाका. त्यांचा हा चित्रपट खूप गाजला होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाचे देखील खूप कौतुक झाले होते.

आधिक वाचा-
चाहत्यांच्या ‘त्या’ कृत्यांनंतर लक्ष्मीकांत यांनी दाखवलेल्या नम्रतेमुळे त्यांनी जिंकले होते लोकांचे मनं
लक्ष्मीकांत बेर्डे यांना दिवसरात्र हा पदार्थ दिला तरी आवडायचा, निवेदिता सराफ यांनी सांगितली खास आठवण

हे देखील वाचा