Wednesday, June 26, 2024

चाहत्यांच्या ‘त्या’ कृत्यांनंतर लक्ष्मीकांत यांनी दाखवलेल्या नम्रतेमुळे त्यांनी जिंकले होते लोकांचे मनं

मराठी मनोरंजनविश्व ज्या नावाशिवाय आज आणि भविष्यात देखील कायम अपूर्ण राहील ते नाव म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. विनोदाचा बेताज बादशाह म्हणून लक्ष्मीकांत यांनी मोठे नाव कमावले. त्यांच्याबद्दल किती आणि काय लिहावे असा प्रश्न प्रत्येक लेखकाला पडत असेल. आज त्यांच्या निधनाच्या अनेक वर्षांनी देखील त्यांच्या आठवणी. त्यांचे किस्से कायम प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. प्रभावी अभिनय, विनोदाचे अचूक टायमिंग, चेहऱ्यावरील कमालीचे एक्सप्रेशन आदी अनेक गोष्टींमुळे त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे अनेक किस्से आजची लोकांच्या चर्चा, विविध शो, त्यांच्या मित्रांच्या तोंडी आपल्याला ऐकायला मिळतात. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या अशाच एका किस्स्याबद्दल सांगणार आहोत, ज्यातून त्यांच्यात असणाऱ्या नम्रतेचे लोकांना दर्शन झाले होते.

लक्ष्मीकांत यांची प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ होती. त्यांना भेटण्यासाठी, पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी उसळायची. लक्ष्मीकांत येणार म्हटल्यावर हजारोंच्या संख्येने लोकं त्यांची एक झलक पाहण्यासाठी आधीच येऊन थांबायचे. एकदा मोठ्या गर्दीने लक्ष्मीकांत यांना बघण्यासाठी यांच्या गाडीवर झेप घेतली आणि…

Photo Courtesy: Instagram/laxmikantberdeofficial

लक्ष्मीकांत आणि विनोद हे जणू समीकरणच झाले होते. मात्र लक्ष्मीकांत यांनी देखील एक वेगळा प्रयोग केला आणि तो यशश्वी देखील झाला. साल होते १९९२ चे त्या वर्षी लक्ष्मीकांत यांचा ‘एक होता विदूषक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच लक्ष्मीकांत हे विनोदी नाही तर एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर आले होते. सिनेमा खूपच वेगळा आणि एका नव्या लक्ष्मीकांत यांना प्रेक्षकांसमोर सादर करणारा होता. हा चित्रपट देखील अमाप गाजला. या सिनेमाने लक्ष्मीकांत यांना एक वेगळी ओळख मिळवून दिली. सिनेमा सुपरहिट झाला होता. या सिनेमानंतर एकदा लक्ष्मीकांत एका ठिकाणी आले होते तिथे यांना पाहण्यासाठी लोकांची तुफान गर्दी झाली होती. लक्ष्मीकांत आले मात्र लोकांचा जमावडा एवढा मोठा होता की त्यांना गाडीतून बाहेरही पडता येत नव्हते. काही लोकं तर त्यांच्या गाडीवर देखील चढले होते.

शेवटी कसे बसे ते त्याच्या गाडीतून बाहेर पडले आणि गर्दीच्या बाहेर येऊन लोकांना म्हणाले, ‘ही गाडी तुम्ही फोडली तरी चालेल. माझी ही गाडी मी तुम्ही दिलेल्या पैशातूनच तर घेतली. तुम्ही आमचे सिनेमे पाहण्यासाठी चित्रपट गृहांमध्ये आलात आणि त्यातून मिळालेल्या पैशातून मी ही गाडी घेतली. या गाडीवर माझा हक्क नाही, मात्र माझ्यावर तुमचा कायमच हक्क असेल.” त्यांचा हा नम्रपणा लोकांना चांगलाच भावला. त्यांनतर लक्ष्मीकांत यांनी लोकांसोबत थोडावेळ घालवला आणि मग ते त्यांच्या कामाला गेले.


हेही वाचा-
‘कुछ कुछ होता है’ करण्यासाठी शाहरुख खानला अजिबात नव्हता इंटरेस्ट, करण जोहरने केला खुलासा
पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी होती देश सोडण्याच्या तयारीत, राज कुंद्राने केला मोठा खुलासा

हे देखील वाचा