Friday, September 20, 2024
Home मराठी लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगांवकर यांच्यासोबत काम करणारी ”ही” अभिनेत्री आठवते का? जाणून घ्या ‘ती’ सध्या काय करते?

लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगांवकर यांच्यासोबत काम करणारी ”ही” अभिनेत्री आठवते का? जाणून घ्या ‘ती’ सध्या काय करते?

मराठी चित्रपटांसाठी सुवर्ण काळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ९० च्या दशकात अनेक चित्रपटांनी लोकप्रियता मिळवली आणि अनेक कलाकारांना ओळख दिली. या काळात अनेक अजरामर सिनेमे प्रदर्शित झाले. या ९० च्या दशकात असे देखील अनेक कलाकार होते, ज्यांनी मोठ्या सिनेमांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या मात्र काही काळानंतर ते या क्षेत्रातून अचानक गायब झाले. असाच ९० च्या दशकातील एका ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणजे ‘हमाल दे धमाल’.

लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगांवकर, सुधीर जोशी, अशोक शिंदे आदी अनेक दिग्गज कलाकारांच्या सदाबहार अभिनयाने नटलेल्या या ऑल टाईम हिट सिनेमाने अमाप लोकप्रियता मिळवली. सिनेमातील गाणी, अभिनय कथा, कलाकार आदी सर्वच गोष्टी आजही प्रेक्षकांच्या आठवणींमध्ये कायम आहे. याच सिनेमात अजून एका अभिनेत्रीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते आणि ती अभिनेत्री म्हणजे वैशाली दांडेकर. वर्षा उसगांवकर यांच्या लहान बहिणीची भूमिका वैशाली यांनी साकारली होती.

मात्र वैशाली या काही सिनेमांमधून समोर आल्या आणि नंतर या इंडस्ट्रीमधून नाहीशा झाल्या. याच वैशाली दांडेकर सध्या काय करता चला तर जाणून घेऊया. हमाल दे धमाल सिनेमाला प्रदर्शित होऊन ३५ वर्षे झाली. वैशाली दांडेकर यांनी या सिनेमात लक्षात राहण्याजोगी भूमिका साकारली. मात्र त्यांनी यासोबतच इतरही अनेक मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहेत. १९८७ साली आलेल्या ‘अंधा युद्ध’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी दूरदर्शनवरील ‘महानगर’ या मालिकेत काम केले. या मालिकेमुळे वैशाली यांना रिमा लागू यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. प्रहार, जखमों का हिसाब, कर्ज तेरे खून का अशा हिंदी चित्रपटातून त्यांनी सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले आहे. अनेक चांगल्या प्रोजेक्टचा भाग असुनही पुढे त्यांनी या क्षेत्रातून बाहेर निघायचे ठरवले.

दरम्यान वैशाली दांडेकर यांनी सेंट लुईस हायस्कुलमधून शिक्षण घेतले. त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी घेत एलएल एमची पदवी मिळवली. वकिलीमध्ये मास्टर्स डिग्री मिळवल्यानंतर वैशाली यांनी लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम सुरु केले. पुढे त्यांनी मनोज गुरव यांच्याशी लग्न केले. २०१२ साली दादर, मुंबई येथील अॅडव्होकेट बाळासाहेब आपटे लॉ कॉलेजमध्ये त्या मुख्याध्यापक या पदावर पोहचल्या. २०२२ मध्ये वैशाली दांडेकर यांनी निवृत्ती घेतली. त्या आता त्यांच्या आयुष्या कुटुंबासोबत पुण्यात घालवत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
तमन्नाला कुणी दिला जगातला पाचवा सर्वात मोठा हिरा? आकडा वाचून तुम्हालाही येईल आकडी
One Friday Night: रवीनाच्या नवीन सिनेमाचा टीझर रिलीज, सस्पेन्स आणि थ्रिलचा भडीमार; तुम्हीही पाहाच

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा