Saturday, June 15, 2024

लक्ष्मीकांत बेर्डे यांची जुनी व्हिडिओ क्लिप व्हायरल, पत्नी प्रियाबद्दलच्या ‘या’ प्रश्नाला उत्तर देताना गोंधळे विनोदवीर

मराठी सिनेसृष्टीतील अमाप लोकप्रिय आणि प्रभावी अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. त्यांचे नुसते नाव जरी उच्चारले तर डोळ्यासमोरून सर्रकन त्यांच्या अनेक चित्रपटाची नावे जातात. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठीमध्ये असा काही नावलौकिक कमावला जो आज इच्छा असूनही कोणी कमावू शकत नाही. लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांचे काम आज ते जाऊन इतक्या वर्षांनी देखील लोकांना आठवते आणि त्यांना ते आवडते आहे. ‘लक्ष्या’ हे नाव ना फक्त जुन्या पिढीतील लोकांना तर आजच्या पिढीतील लोकांना देखील ओळखीचे आहे. खूप कमी वयात मोठे नाव कमावल्यानंतर त्यानी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी आजही भरून निघालेली नाही. अशातच सध्या सोशल मीडियावर त्यांची एक क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमुळे पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांना त्यांची आठवणींना उजाळा देण्याची एक संधी मिळाली आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील सुवर्णकाळ म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे यांचा काळ ओळखला जातो. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगांवकर यांनी एकत्रितपणे मराठी सिनेविश्वात एकच मनोरंजनाचा धमाका केला होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी विनोदी भूमिकांमधून त्यांचे वेगळे पण जपले सोबतच त्यांनी गंभीर भूमिका देखील तितक्याच ताकदीने केल्या. त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील तुफान गाजले. त्यांनी अभिनेत्री प्रिया अरुण यांच्याशी लगीनगाठ बांधली होती. अनेक चित्रपटांमध्ये या दोघांनी भूमिका साकारल्या. त्यांची जोडी देखील प्रेक्षकांची आवडती जोडी होती. सोशल मीडियावर व्हायरल होणार व्हिडिओ देखील या जोडीचा आहे. ९० च्या दशकात एका मुलखतीमधील ती एक क्लिप आहे. ‘जोडी नं १’ मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि प्रिया बेर्डे आले असताना रेष टिपणीसने त्यांची मुलाखत घेतली होती. यावेळी त्यांनी तिला मनमोकळी उत्तरे दिली.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये रेशीम टिपणीस लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारते, ‘तुम्ही प्रियांना दिलेले पहिले गिफ्ट कोणते? यावर उत्तर देताना लक्ष्मीकांत म्हणाले, ‘मी तिला खूप गिफ्ट दिले आहेत’. यावर रेशम म्हणते, असे नाही पहिले गिफ्ट कोणते ते सांगा…. यावर लक्ष्मीकांत म्हणतात, ‘मी प्रियाला पाहिले गिफ्ट म्हणून एक साडी दिली होती’. लक्ष्मीकांत यांची ही दुर्मिळ मुलाखत सध्या प्रचंड चर्चेत आली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी

‘रामायण’मध्ये ‘मंथरा’ बनण्यापूर्वी ‘या’ सर्वोत्तम भूमिका साकारत ललिता पवार यांनी गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य, टाका एक नजर

हे देखील वाचा