जेव्हाही बॉलिवूड अभिनेत्यांच्या मैत्रीचे किस्से ऐकवले जातात, तेव्हा त्यामध्ये सुनील शेट्टी आणि जॅकी श्रॉफ यांच्या नावाचा समावेश आवर्जुन होतो. या दिग्गज अभिनेत्यांची मैत्री खूप जुनी आहे. मागील 50 वर्षांपासून हे दोघेही प्रत्येक सुख-दु:खात एकमेकांची साथ निभावताना दिसले आहेत. मात्र, नुकतेच दोघांचाही असा व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने चाहत्यांनाही डोकं खाजवायला भाग पाडले आहे. या कलाकारांमध्ये नक्की काय शिजतंय, हे चाहत्यांना जाणून घ्यायचंय.
सुनील आणि जॅकी यांचा व्हिडिओ
सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यांना पाहून असे वाटते की, दोघेही कोणत्यातरी स्क्रिप्टवर काम करताना दिसत आहेत. तसेच, कुठेतरी जाण्याबद्दलही बोलत आहेत. त्यांचा हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर आता चाहतेही अपेक्षा करत आहेत की, लवकरच हे दोघेही कोणत्यातरी सिनेमा किंवा वेबसीरिजमध्ये दिसणार आहेत. तसेच, दोघांनीही कोणत्यातरी प्रोजेक्टसाठी हातमिळवणी केल्याचाही चाहत्यांमध्ये सूर आहे.
हेही वाचा- ‘तु कोण आहेस?’, नेहा कक्करवर भडकले ए. आर रहमान, रिमेक पद्धतीवर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
‘कौन बनेगा करोडपती’मध्ये झळकलेले
या प्रोजेक्टपूर्वी सुनील आणि जॅकी दोघेही एकसोबत ‘कौन बनेगा करोडपती’ या शोमध्ये झळकले होते. या शोमध्ये त्यांनी आपल्या आयुष्याशी निगडीत गुपीते सांगितली होती, जी त्यांच्या चाहत्यांनादेखील माहिती नव्हती. जॅकी यांनी सांगितले होते की, जेव्हा त्यांचे वडील आजारी होते, तेव्हा सुनीलनेच त्यांना आपले घर दिले होते, जेणेकरून त्यांच्या वडिलांवर योग्यप्रकारे उपचार घेतले जातील.
View this post on Instagram
जॅकी यांच्या वक्तव्याने सर्वजण भावूक
सुनीलने या शोमध्ये सांगितले होते की, एकदा जॅकी दादाने खूप चांगली गोष्ट सांगितली होती. ते म्हणाले होते की, “जेव्हा मी एका खोलीत राहायचो आणि आई खोकायची, तेव्हा समजायचे की, आईला खोकला आला आहे. जेव्हा यश मिळाल्यानंतर मोठ्या घरात गेलो, तेव्हा आपल्या वेगळ्या खोलीत राहिल्यानंतर आईचे कधी निधन झाले, कळलेच नाही.”
जॅकी श्रॉफ यांचे हे वक्तव्य ऐकून प्रत्येकजण भावूक झाला होता. ‘कौन बनेगा करोडपती’ या शोनंतर दोघेही पुन्हा एकदा एकत्र दिसले आहेत. आता त्यांच्या आगामी प्रोजेक्टसाठी चाहतेही उत्सुक आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘मी नग्न असताना अन् अंघोळ करताना त्यांनी मला पाहिलंय’, प्रसिद्ध गायिकेने कुणाविरुद्ध केला धक्कादायक खुलासा?
मानलं भावा तुला! रश्मिकापुढे शर्टची बटणे काढून चाहत्याने मागितला ऑटोग्राफ, लाजून लाल झाली अभिनेत्री