मानलं भावा तुला! रश्मिकापुढे शर्टची बटणे काढून चाहत्याने मागितला ऑटोग्राफ, लाजून लाल झाली अभिनेत्री

0
158
Rashmika-Mandanna

चाहते आणि कलाकार यांचं फार जुनं नातं आहे. चाहत्यांमुळेच कोणत्याही कलाकाराला प्रसिद्धी मिळते. चाहत्यांनी जर कलाकारांनी डोक्यावर घेतलं, तर कलाकार एका रात्रीत स्टार झाल्याशिवाय राहत नाहीत. याची अनेक उदाहरणे बॉलिवूडमध्ये आहेत. मात्र, अनेकदा चाहते असे काही करतात, ज्याची कलाकारांनाही अपेक्षा नसते. असेच काहीसे अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्यासोबत झाले आहे. रश्मिका तिच्या ‘गुडबाय’ या आगामी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. अशात या सिनेमाचे प्रमोशन करत असतानाचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

रश्मिकाचा व्हिडिओ
अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही एका पुरस्कार सोहळ्यात पोहोचली होती. यादरम्यान एका चाहत्याने रश्मिकाकडे अशी मागणी केली, जी ऐकून रश्मिकाही लाजून लाल झाली. झाले असे की, एका चाहत्याने आपल्या शर्टची बटणे उघडून रश्मिकाला आपल्या छातीवर ऑटोग्राफ देण्याची विनंती केली. चाहत्याची मागणी ऐकून रश्मिकाही हैराण झाली. मात्र, नंतर रश्मिकाने मार्करने आपला ऑटोग्राफ दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

‘नॅशनल क्रशन’ रश्मिका मंदानाचा हा व्हिडिओ चाहत्यांना भलताच आवडला आहे. अनेकजण कमेंट करून प्रतिक्रियांचा पाऊस पाडत आहेत. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानी याने हा व्हिडिओ त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक केले आहे. एकाने लिहिले की, “मला रश्मिका खूप आवडते. ती खूप सुंदर आहे.” दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, “तुमचे एक्सप्रेशन्स नेहमीच चांगले असतात.”

रश्मिकाचे आगामी सिनेमे
रश्मिका मंदाना ही अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘गुडबाय’ या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा 7 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त रश्मिकाच्या खात्यात आणखी एक सिनेमा आहे. रश्मिका ‘मिशन मजनू’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा हादेखील झळकणार आहे. रश्मिकाचे सिनेमे पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
लाजीरवाणे! साऊथच्या प्रसिद्ध अभिनेत्याचं न शोभणारं कृत्य; मुलाखतीवेळी कॅमेरा बंद करून महिला एँकरला…
अभिनेत्री रसिकासाठी नवरात्र आहे खूपच खास, 250 नेत्रहीन मुलींसोबत लुटला गरब्याचा आनंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here