Sunday, February 23, 2025
Home अन्य घरगुती हिंसाचारात कोर्टाने मानले लिएंडर पेसला दोषी, रिया पिल्लईला द्यावी लागणार मोठी रक्कम

घरगुती हिंसाचारात कोर्टाने मानले लिएंडर पेसला दोषी, रिया पिल्लईला द्यावी लागणार मोठी रक्कम

भारतातील दिग्गज टेनिस स्टार लिएंडर पेसला (Leander Paes) मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोरत्ने घरगुती हिंसाचारामध्ये अपराधी मानले आहे. लिएंडर पेसवर २०१४ साली त्याची माजी गर्लफ्रेंड आणि लिव्ह इन पार्टनर असलेल्या रिया पिल्लईने (Riya Pillai) घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले होते. या आरोपानंतर आता कोर्टाने त्याला दोषी करार दिला आहे. यासोबतच कोर्टाने त्याला प्रत्येक महिन्याला रियाला घराचे भाडे देखील पाठवण्यास सांगितले आहे. लिएंडर पेसने टेनिसमधून निवृत्ती घेतल्यानंतर गोव्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांआधी त्रिमूळ काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

लिएंडर पेसने अनेक वर्ष अभिनेत्री आणि मॉडेल असणाऱ्या रिया पिल्लईला डेट केले होते. जवळपास आठ वर्ष ते दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या दरम्यान त्या दोघांना एक मुलगी देखील झाली जिचे नाव त्यांनी अकिरा ठेवले. मात्र २०१४ साली रियाने लिएंडर पेसवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावत कोर्टात केस टाकून एलमनी मागितली. कोर्टाने यावर मागच्या आठवड्यातच निर्णय दिला मात्र मीडियाला याबाबत माहिती दिली नव्हती.

कोर्टाने त्यांच्या निर्णयात सांगितले की, लिएंडर पेसने रियाचे भावनात्मक, आर्थिक आणि शाब्दिक शोषण केले आहे. यामुळे रिया खूपच नाराज होती. रियाने लिएंडर पेससोबत खरेदी केलेल्या घराचा वाटा करण्याची मागणी केली होती. रियाच्या या मागणीला नाकारत कोर्टाने रियाला ते घर सोडण्यास सांगितले आहे. याशिवाय लिएंडर पेसला आदेश दिला आहे की, तिला दर महिन्याला दिड लाख रुपये देण्यास सांगितले आहे. यातले ५० हजार भाड्याचे आणि १ लाख रुपये मेन्टेन्सचे असणार हे पैसे त्याला मार्च महिन्यापासून द्यावे लागणार आहे. दरवर्षी ही रक्कम ५ टक्क्यांनी वाढणार आहे.

मॅजिस्ट्रेट कोमल सिंग राजपूतने हे स्पष्ट केले आहे की, जर रिया त्या घरात राहणार आले तर रियाला पेसकडून कोणत्याही प्रकारची रक्कम मिळणार नाही. त्यांनी हे देखील सांगितले आहे की, पेसचे करिअर आता जवळपास संपुष्टात आले असून, त्याला स्वतःचे आणि रियाचे भाड्याचे पैसे देणे शक्य होणार नाही.

रिया ही संजय दत्तची पहिली पत्नी असून, दोघांचा घटस्फोट झाला आहे. या दोघांचा घटस्फोट होण्याआधीच रियाचे पेससोबत अफेयर सुरु झाले होते. पेसने दावा केला होता की, जेव्हा त्याचे रियासोबत नाते सुरु झाले तेव्हा त्याला ती विवाहित आहे हे माहित नव्हते. तर रियाने सांगितले होते की, तिची तेव्हा घटस्फोटाची प्रक्रिया सुरु झाली होती. हे तिने पेसला सांगितले होते. सध्या पेस अभिनेत्री किम शर्माला डेट करत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा