Thursday, July 18, 2024

‘या’ कारणामुळे लीला मिश्रा वयाच्या १८ व्या वर्षापासूनच करत होत्या आईची भूमिका, वाचा कारण

हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय चित्रपट म्हणून ‘शोले’ चित्रपटाच नाव आजही घेतलं जातं. गर्दिचे, कमाइचे सर्व विक्रम या चित्रपटाने मोडून काढले होते. या चित्रपटामधील प्रत्येक कलाकाराला भरभरुन प्रसिद्धी मिळाली. याच चित्रपटातील महत्वाची व्यक्तिरेखा म्हणजे बसंतीच्या मावशीची भूमिका साकारणारी अभिनेत्री लीला मिश्रा. वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली मात्र त्यांनी आपल्या संपुर्ण कारकिर्दित फक्त नायकाच्या आईच्याच भूमिका साकारल्या आहेत हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, काय आहे या मागच विशेष कारण चला जाणून घेऊ.

दिवंगत अभिनेत्री लीला मिश्रा यांच्या अनेक भूमिका प्रसिद्ध आहेत. त्यांनी कधी नायकाच्या आई बनून तर कधी प्रेम प्रकरणात अडथळा आणणाऱ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या खऱ्या आयुष्याची कहाणी ही एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच आहे. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी त्यांचा विवाह राम प्रसाद मिश्रा यांच्यासोबत झाला होता. जे त्या काळातील मुकपटांमध्ये काम करत होते. लीला यांनी १७ व्या वर्षी दोन मुलींना जन्म दिला होता. अगदी कमी वयात म्हणजे अठराव्या वर्षी त्यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली. मात्र इतके कमी वय असताना ही लीला यांनी फक्त आई, मावशी अशाच भूमिका केल्या. त्यांनी कधीही पडद्यावर हिरोसोबत रोमांस केला नाही, आणि यामागे कारणही मजेशीर आहे.

त्यांना आपल्या पहिल्या चित्रपटात एका भिकारीची भूमिका मिळाली होती. या चित्रपटाला खुद्द कोल्हापुरच्या राजांनी मान्यता दिली होती. परंतु लीला मिश्रा यांनी हा चित्रपट नाकारला कारण यामध्ये एका ठिकाणी त्यांना अभिनेत्याला मिठी मारत रोमँटिक सीन करायचा होता ज्याला त्यांनी नकार दिला.

त्यानंतर त्यांना ‘सम्मान’ नावाच्या आणखी एका चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. यामध्ये अभिनेता शाहू मोडकसोबत त्यांना काम करायचे होते मात्र या चित्रपटातही त्यांना नायकाला मिठी मारायची होती आणि यावेळी ही त्यांनी नकार दिला मात्र निर्मात्यांनी करार केल्याने ते त्यांना बाहेरही काढू शकत नव्हते त्यामुळे त्यांना नायकाच्या आईची भूमिका मिळाली. आणि इथुनच वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी आईची भूमिका साकारली.

असं म्हणतात की, त्या काळात त्यांना पतीपेक्षा जास्त पगार मिळत होता. त्यांना मामा शिंदे नावाच्या व्यक्तीने पहिल्यांंदा काम दिले जे दादासाहेब फाळकेंकडे कामाला होते. त्या काळात सिनेसृष्टीत महिला कलाकारांची इतकी कमतरता होती की, या कामासाठी त्यांना ५०० रूपये मिळायचे तर त्यांच्या पतीला फक्त १५० रूपये मिळत होते.

हेही वाचा :

बिग बॉसमध्ये आलेल्या ज्योतिषाने केली बिग बॉस १५ च्या विजेत्याची घोषणा, सर्वांना पछाडत ‘हा’ स्पर्धक ठरणार विजेता?

काळी लिपस्टिक आणि चेहऱ्यावरील आर्ट, रुबीना दिलैकचा नवा लूक पाहून चाहतेही चक्रावले

धक्कादायक! अभिनेत्री कृती सेननला देखील करावा लागला बॉडी शेमिंगचा सामना

 

 

हे देखील वाचा