Friday, August 8, 2025
Home साऊथ सिनेमा हातात सिगारेट घेतलेल्या ‘माँ काली’च्या पोस्टरने उडवली खळबळ, चित्रपट निर्मातीच्या अटकेच्या मागणीने धरला जोर

हातात सिगारेट घेतलेल्या ‘माँ काली’च्या पोस्टरने उडवली खळबळ, चित्रपट निर्मातीच्या अटकेच्या मागणीने धरला जोर

बॉलिवूड चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांच्यावर रिलीझपूर्वी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला आहे. काही दिवसांपूर्वीच ‘ब्रह्मास्त्र’ या बिग बजेट चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. ज्यामध्ये रणबीर कपूर (Ranbir Kapoor) मंदिरात बूट घालून दिसला होता. या सीनमुळे सोशल मीडियावर नेटकरी प्रचंड संतापले होते. त्याचवेळी आता असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. अलीकडेच भारतीय चित्रपट निर्माती लीना मनिमेकलाई हिने तिच्या माहितीपटाचे पोस्टर शेअर केले आहे, ज्यावर आता बराच वाद होत आहे. या पोस्टरमध्ये काली माँ सिगारेट ओढताना दाखवण्यात आली असून, हे पाहून लोक प्रचंड संतापले आहेत.

खरं तर, लीना मणिमेकलाईच्या आगामी माहितीपटाचे नाव ‘काली’ आहे, ज्याचे पोस्टर तिने काल ट्विटरवर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये एक अभिनेत्री काली माँच्या अवतारात असून, ती सिगारेट ओढताना दिसत आहे. या पोस्टरसोबत लीनाने सांगितले की, ती या प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहे कारण तिची ‘काली’ ही डॉक्युमेंट्री कॅनडा फिल्म फेस्टिव्हलमध्ये लॉन्च झाली आहे. (leena manimekalai documentary controversial poster viral maa kaali smoking)

मात्र, लीनाने तिच्या डॉक्युमेंटरीचे हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करताच, ते पाहून लोक संतापले. पोस्टरमधील माँ कालीचा हा अवतार सोशल मीडिया यूजर्सना अजिबात आवडला नाही आणि आता लोकांनी लीनावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. एका यूजरने लिहिले की, “हिंदू धर्माच्या भावना रोज दुखावल्या जातात. हे लोक आमच्या संयमाची परीक्षा घेत आहेत.” काही युजर्सनी लीनाला असेही विचारले की, ती दुसऱ्या धर्माच्या देवाला अशा प्रकारे धूम्रपान करताना दाखवू शकते का?

लीना मणिमेकलाई यांनी शेअर केलेल्या या पोस्टरने इतर कारणांमुळेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टरमध्ये काली माँची वेशभूषा केलेल्या अभिनेत्रीने एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात LGBTQ समुदायाचा ध्वज घेतला आहे. हेच या पोस्टरकडे लोकांना आकर्षित करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा