मराठी सिनेसृष्टीतून दुःखद बातमी समोर येत आहे. मराठी, हिंदी सिनेसृष्टीतील एक ज्येष्ठ आणि पितृतुल्य व्यक्तीमत्व अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे निधन झाले आहे. मुंबईतील धीरुभाई अंबानी रूग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने रमेश देव यांचे निधन झाले असून, त्यांनी वयाच्या ९३व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे.
रमेश देव यांचा मुलगा आणि अभिनेते अजिंक्य देव यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.
अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून त्यांची मोठी ओळख होती. त्यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांच्या अभिनयाची झलक दाखवली होती. ‘आनंद’ सिनेमातील त्यांची भूमिका विशेष गाजली.
रमेश देव यांच्या यांनी १९५० साली त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामुळेच केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी भाषिक प्रेक्षकही त्यांचा चाहता आहे.
कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांना हिंदी चित्रपटात छोट्या भूमिका मिळायच्या. मात्र त्यांची प्रतिभा पाहता, त्यांना हिंदी सिनेमात सहकलाकाराची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.
महत्वाचे म्हणजे, अवघ्या ३ दिवसांपूर्वीच रमेश देव यांचा ९३वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक चाहत्यांनी अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र वाढदिवसाच्या केवळ ३ दिवसांनंतर रमेश देव यांनी अखेरचा श्वास घेतला. रमेश देव यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीने तारा गमावल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा-