Monday, October 14, 2024
Home मराठी आणि शरद पवार माझ्याकडे बघून हसायला लागले; अशोक सराफ यांनी सांगितला तो किस्सा…

आणि शरद पवार माझ्याकडे बघून हसायला लागले; अशोक सराफ यांनी सांगितला तो किस्सा…

अशोक सराफ आज एक लिजेंड आहेत. गेली पाच दशके नाटक, सिनेमे, मालिका अशा विविध माध्यमांतून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ते आता नवरा माझा नवसाचा या प्रसिद्ध सिनेमाच्या दुसऱ्या भागात लवकरच प्रेक्षकांना दिसणार आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्या सोबतचा एक किस्सा शेयर केला आहे. 

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यांनी शरद पवार यांच्याशी निगडीत एक किस्सा सांगितला. अशोक सराफ यांना एक प्रश्न विचारला गेला की, कधी कुणी तुमच्या फक्त चेहऱ्याकडे बघून हसलय का ? तर त्यावर ते म्हणाले की, हो असं झालंय एकदा. मी भूमिकाच अशा केल्या आहेत की त्याचा परिणाम असा होतो की लोक बघुनच हसायला लागतात. शरद पवार यांच्यासारखा माणूस माझ्याकडे बघून हसला आहे म्हणजे काय बोलायचं. शरद पवार हे गंभीर स्वभावाचे व्यक्ती आहेत आणि ते देखील माझ्याकडे पाहताच हसायला लागले. 

अशोक सराफ पुढे म्हणाले, मी शरद पवारांच्या मुलीच्या लग्नात गेलो होतो. पुढे त्यांना स्टेजवर भेटायला गेलो. फोटो काढले. मग शरद पवार माझ्याकडे बघून हसले. मी त्यांना म्हणालो साहेब तुम्ही अजूनही ओळखता वाटतं मला. अशी हि गमतीदार आठवण अशोक सराफ यांनी यावेळी सांगितली. 

अशोक सराफ येत्या २० सप्टेंबर रोजी नवरा माझा नवसाचा २ या सिनेमात दिसणार आहेत.  या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केले आहे. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

खलनायक बनून प्रेक्षकांची मने जिंकत आला आहे सैफ अली खान; काही भूमिका ठरल्या आयकॉनिक…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा