हिंदी संगीतविश्वाविषयी जेव्हाही चर्चा होईल, तेव्हा किशोर कुमार यांच्या नावाची चर्चा झाल्याशिवाय राहणार नाही. किशोर कुमार यांनी त्यांच्या कारकीर्दीत 2678 गाणी गायली आहेत. ही गाणी त्यांनी वेगवेगळ्या 110संगीत दिग्दर्शकांसोबत गायली आहेत. विशेष म्हणजे, ही फक्त हिंदी गाणी होती. त्यांनी विविध भाषेतही अनेक गाणी गायली आहेत. त्यांची गाणी आजही चाहत्यांच्या ओंठांवर रुळलेली असतात. त्यात ‘ये शाम मस्तानी’, ‘हमें तुमसे प्यार कितना’ आणि ‘मेरे महबूब कयामत होगी’ यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे. किशोरदांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा अमित कुमार यांनीही संगीत क्षेत्रात नाव कमावले आहे. ते नेहमीच किशोरदांची आठवण करून देत असतात.
खरं तर, सोशल मीडियावर अमित कुमार (Amit Kumar) यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये ते अगदी त्यांचे वडील किशोर कुमार (Kishore Kumar) यांच्यासारखे दिसत आहेत. मुलामध्ये वडिलांची झलक पाहून चाहतेही खुश झाले आहेत.
थ्रोबॅक फोटो शेअर करतात अमित कुमार
अमित कुमार हे किशोर कुमारांची कार्बन कॉपी असल्याचे चाहते म्हणतात. अमित हे नेहमीच त्यांच्या कुटुंबाचे यादगार फोटो शेअर करत असतात. त्यांनी त्याच्या लहानपणीचा मौल्यवान फोटो शेअर केला होता. त्यामध्ये किशोर कुमार बसल्याचे दिसत आहेत. तसेच, आणखी एक फोटो समोर आला होता, ज्यामध्ये ते कुर्ता-पायजमामध्ये अगदी त्यांच्या वडिलांसारखेच दिसत आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
अमित कुमारांचा फोटो पाहून चाहतेही हैरान
गायक अमित कुमारांच्या फोटोवर कमेंट करून चाहते आश्चर्य व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले की, “तुम्ही एकदम तुमच्या वडिलांसारखे दिसता.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “सर, तुम्ही तर वडिलांचीच सावली आहात.” अमित कुमार हे फक्त वडिलांसारखे दिसतच नाहीत, तर ते त्यांच्यासारखेच सुमधूर गातातही.
View this post on Instagram
View this post on Instagram
किशोर कुमारांनी वयाच्या 57 व्या वर्षी घेतला होता जगाचा निरोप
अमित कुमार यांच्या आवाजातही तीच खनक आहे, जी त्यांच्या वडिलांच्या आवाजात होती. चाहत्यांनाही अमित कुमार यांनी गाताना पाहिले आहे. अमित कुमार यांचे ‘बडे अच्छे लगते हैं’ हे गाणे खूप गाजले होते. असे असले, तरीही अमित कुमार आणि किशोर कुमार यांच्या गायकीची बरोबरी करणे खूप कठीण आहे. किशोरदांनी वयाच्या ५७व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. मात्र, एवढ्या कमी वयातही त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर रचले होते.
अधिक वाचा-
–मराठमोळ्या उर्मिला निंबाळकरचं सेक्सी फोटोशूट, बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर
–‘लाळ टपकेपर्यंत पान खाणे अन् धोतरवर…’, किशोर कुमारांच्या अटी ऐकून हादरले बीआर चोप्रा