Saturday, June 29, 2024

लता दीदींना होती महागडे दागिने अन् आलिशान गाड्यांची आवड; मागे ठेवलीये 350 कोटींहून अधिकची संपत्ती, ज्याचे वारस…

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची आज 6 फेब्रुवारीला पहिली पुण्यतिथी आहे. लता दीदी यांनी कारकिर्दीच्या शिखरावर असताना अमाप संपत्तीही कमावली होती. निधनानंतर लता मंगेशकर आपल्यामागे ही संपत्ती सोडून गेल्या आहेत. तसेच त्यांच्याकडे आलिशान गाड्यांचाही ताफा होता. चला तर जाणून घेऊया त्यांच्या संपत्तीबद्दल…

लता मंगेशकर यांची संपत्ती किती?
इतकी मोठ्या कारकीर्द असणाऱ्या लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी पहिले गाणे हे ‘किती हसाल’ या मराठी सिनेमासाठी गायले होते. त्यांचे हे गाणे कधीच प्रदर्शित झाले नाही. सुरुवातीला त्यांची कमाई फक्त 25 रुपये एवढी असल्याचे सांगितले जाते. मात्र, जसा काळ लोटत गेला, त्यांच्या संपत्तीत कमालीची वाढ झाली. त्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीच्या मालकीण बनल्या. माध्यमातील एका वृत्तानुसार, लता मंगेशकर यांची एकूण संपत्ती 360 कोटींहून अधिक रुपये आहे. त्यांची अधिक कमाई ही त्यांच्या गाण्यांच्या रॉयल्टीमधून आणि त्यांच्या गुंतवणुकीतून व्हायची. विशेष म्हणजे, शेवटच्या काळात त्यांची महिन्याची कमाई 40 लाख आणि वर्षाची कमाई 6 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. हे सर्व त्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मिळवले होते.

कपडे, दागिने आणि गाड्यांचीही होती आवड
लता मंगेशकर हे मुंबईच्या पॉश भागात म्हणजेच पेडर रोडवरील बंगल्यात राहत होत्या. त्यांच्या बंगल्याचे नाव ‘प्रभुकुंज भवन’ हे आहे. त्यांना नेहमीच कपडे, महागडे दागिने आणि आलिशान गाड्यांची आवड होती. त्यांच्या ताफ्यात एका पेक्षा एक गाड्या होत्या. त्यांनी आपल्या एका मुलाखतीतही सांगितले होते की, त्यांना गाड्यांची खूप आवड आहे. यशाच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली, तेव्हा त्यांनी सर्वात आधी इंदोरमधून एक ‘शेवरलेट’ कार विकत घेतली होती. त्यानंतर त्यांनी ‘बुईक’, ‘हिलमॅन’ आणि ‘क्रिस्लर’ या गाड्याही आपल्या ताफ्यात जोडल्या होत्या.

यश चोप्रा यांनी भेट म्हणून दिली होती मर्सिडीज
बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक यश चोप्रा यांनी लता मंगेशकर यांना भेट म्हणून एक ई- क्लास मर्सिडीज गाडी दिली होती. त्यांनी मुलाखतीत सांगितले होते की, “दिवंगत यश चोप्रा हे मला आपली बहीण मानायचे आणि ते खूप प्रेमळही होते. ‘वीर-जारा’ या सिनेमाच्या संगीताच्या प्रदर्शनावेळी त्यांनी एका मर्सिडीज गाडीची चावी माझ्या हातात ठेवली होती आणि सांगितले होते की, ते मला ही गाडी भेट म्हणून देत आहेत.”

गानकोकिळा लता मंगेशकर यांनी शाहरुख खान, प्रीति झिंटा आणि राणी मुखर्जी यांच्या या सिनेमातील सर्व गाणी गायली होती. त्यांना फोटोग्राफीचीदेखील आवड होती. त्यांनी अनेक महागडे आणि व्यावसायिक कॅमेरे जमा केले होते.

कोण होणार त्यांच्या संपत्तीचा मालक?
लता मंगेशकर यांनी आपल्या आयुष्यात लग्न केले नाही. अशात त्यांच्या मागे त्यांच्या बहिणी आणि भाऊ आहेत. त्यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला. अशात तेच त्यांच्या संपत्तीचे मालक होऊ शकतात. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

लता मंगेशकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत तब्बल 36 भाषांमध्ये 50 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.  इतक्या गोड गळ्याच्या लता मंगेशकर या जगात नसल्या, तरीही त्या त्यांच्या आवाजाने प्रेक्षकांच्या हृदयात कायम राहतील.(legendary singer lata mangeshkar expensive home in posh area of south mumbai also owned a fleet of cars)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
तब्बल 17 वर्षानंतर खिलाडी कुमार आणि दबंग खानने एकत्र लावला ठुमका, पाहाच व्हायरल व्हिडिओ

जगातल्या 200 सर्वोत्कृष्ट गायकांमध्ये लता दीदींचा समावेश, बहुमान मिळालेल्या दीदी ठरल्या एकमेव भारतीय

हे देखील वाचा