Wednesday, June 26, 2024

लता दीदींच्या तब्येतीविषयी महत्त्वाची अपडेट; वाचा काय म्हणाले डॉक्टर

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी मोठी बातमी समोर आली आहे. त्या अजून काही काळ रुग्णालयातच राहतील, अशी माहिती मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिली आहे.

लता दीदींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्या आणखी काही दिवस आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील, असेही पुढे बोलताना त्यांनी सांगितले. त्यांची तब्येत पूर्वीसारखीच असून त्यांना भेटण्यासाठी कुणालाही परवानगी दिली जात नाहीये.

डॉक्टरांचा खुलासा
लता दीदींना आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. त्यांचे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी खुलासा केला आहे की, लता दीदींच्यावर अजूनही आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. माध्यमांशी बोलतानाही डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या आरोग्याची माहिती सार्वजनिक न करावी अशी लता दीदींची इच्छा आहे.

उपचारादरम्यान झाली कोरोनाची लागण
लता दीदी ब्रीच कँडी हॉस्पिटलच्या डी वॉर्डमध्ये दाखल होत्या. वॉर्डच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लता मंगेशकर या तीन दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये इतर काही वैद्यकीय स्थितीच्या तपासणीसाठी आल्या होत्या, परंतु येथे उपचारादरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली.

हेही पाहा- मराठी सिनेसृष्टीतील ‘या’ कलाकारांनी दोनदा केलंय लग्न

लता दीदींची कारकीर्द
त्यांनी १९४२ मध्ये त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यावेळी त्या फक्त १३ वर्षांच्या होत्या. तब्बल ७ दशकांच्या आपल्या या दीर्घ कारकिर्दीत लता दीदींनी अनेक भारतीय भाषांमध्ये ३०००० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांची गनणा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्तम महिला पार्श्वगायिकांमध्ये होते. त्यांना ३ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १५ बंगाली चित्रपट पत्रकार संघ पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्या ‘ये कहां आ गए हम’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘नीला अस्मान सो गया’ आणि ‘तेरे लिए’ यांसारखी लोकप्रिय गाण्यांसाठी ओळखल्या जातात.

हेही वाचा-

हे देखील वाचा