Friday, March 31, 2023

‘ही माझी भाषा नाही,’ म्हणत तेजस्वी प्रकाशवर संतापली गौहर खान, घरात झाला मोठा वाद

कलर्स वाहिनीवरील ‘बिग बॉस १५’ हा कार्यक्रम सध्या रंगतदार अवस्थेत आल्याच पाहायला मिळत आहे. कार्यक्रमाचा अंतिम भाग आता जवळ आला असून या भागामध्ये बिगबॉस विजेती गौहर खान सहभागी होणार आहे. या एपिसोडचा प्रोमो सध्या समोर आला असून कार्यक्रमात अंतिम फेरीतील स्पर्धक स्वताःलाच या कार्यक्रमाच्या विजेतेपदाचा प्रमुख दावेदार सिद्ध करताना, बाकी स्पर्धक त्याच्यापुढे कसे कमकुवत आहेत हे सांगताना दिसत आहेत. यामुळे प्रत्येकजण एकमेकांवर कुरघोडी करताना दिसणार आहे. सोबतच गौहर खानच्या सहभागाने या भागाची रंगत आणखीणच वाढणार आहे.

बिगबॉसची माजी विजेती गौहर खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे बिग बॉसच्या पुढील भागात गौहर खानच आगमन होणार आहे. त्यामुळे गौहर खानचे चाहते सध्या हा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. कार्यक्रमाच्या ‘विकेंड का वार’ मध्ये एका खास टास्कसाठी घरामध्ये जाणार असून यावेळी तिचा आणि तेजस्वी प्रकाशचा वाद झाल्याचही पाहायला मिळणार आहे. (gauhar khan slammed twjasswi prakash in bigboss house)

अंतिम फेरीआधी स्पर्धकांमध्ये रंगणार वाद….

या प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की, गौहर खानसमोर एक रंगतदार टास्क पार पडणार आहे, यामध्ये प्रत्येक स्पर्धक मीच कसा विजेतेपदासाठी योग्य आहे. हे सांगताना, कोणते स्पर्धक त्यांच्यासमोर कमकुवत आहेत, टिकावच धरु शकत नाहीत हे सांगणार आहेत. यावेळी शमिता शेट्टी, रश्मी शेट्टी आणि देवोलिना भट्टाचार्जीवर निशाना साधताना दिसत आहे. या दोघीही माझ्या स्पर्धकच नाहीत असाच दावा तिने केला आहे.

तेजस्वी प्रकाश आणि गौहर खानमध्ये झाला वाद…

या टास्कमध्ये तेजस्वी प्रकाशने निशांत भट्ट आणि रश्मि देसाईला आपले स्पर्धक नसल्याच जाहीर केलं . यावेळी निशांतवर थेट हल्ला करताना तो म्हणाला की, कार्यक्रमात त्याची स्वतःची अशी काहीच ओळख नाही, यावेळी प्रत्युतर देताना निशांतने तू सगळे माझ्यावर अन्याय करतात ,म्हणत सतत रडत असतेस असा आरोप केला. यावेळी दोघेही एकमेकांविरोधात जोरदार आरोप करतात, त्यामुळे गौहर खान निशांतला शांत राहण्यास सांगते.

त्याचवेळी तेजस्वी प्रकाश गौहर खानची सूचना निशांतला सांगताना ‘ती तुला आपलं तोंड बंद ठेवायला सांगत आहे.  असं म्हणते. यावेळी संतापलेली गौहर खान तुझी भाषा माझ्या नावाने खपवू नकोस, ही माझी भाषा नाही अस स्पष्ट शब्दात सुनावते. गौहरच्या या बोलण्यावरुन तिला हे आवडल नसल्याचं स्पष्ट दिसत होत, ज्यामुळे तेजस्वीची बोलती बंद झाली. थोडक्यात या धमाकेदार प्रोमोवरुन हा एपिसोड चांगलाचं रंगतदार होणार असल्याच दिसत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा