नुकतंच कलाविश्वातून एक दु:खद बातमी समोर येत आहे. दिग्गज गायिका सुमित्रा सेन यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांनी कोलकत्तामधील आपल्या राहत्याघरी अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी प्रख्यात रवींद्र संगीत कलाकार सरबानी सेन यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही बातमी कळवली आहे.
सुमित्रा सेन यांची मुलगी सरबानी सेन यांनी सकाळी पाहाटे आपल्या फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “आज पाहाटे आमची आई आम्हाला सोडून गेली.” यानंतर ही बातमी सर्वत्र पसरली. सुमित्रा सेन या बंगालमधील प्रसिद्ध गायिका होत्या. त्याशिवाय त्यांची मुलगी देखिल कोलकत्तामधील प्रख्यात गायिका आहे.
माध्यमातील वृत्तानुसार गेल्या महिन्यातच सुमित्रा सेन यांना सर्दी झाली होती त्यामुळे त्यांना 29 डिसेंबर रोजी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची तब्येत अजून बिघडल्याने त्यांना घरी आणले जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात असताना, सुमित्रा सेन यांना ब्रॉन्कोप्न्यूमोनिया झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, त्यांच्या तब्येत खूपच बिघडली होती आणि शेवटी त्यांनी मंगळवार (दि, 3 जानेवारी) रोजी अखेरचा श्वास घेतला.
सुममत्रा सेन यांना 2012 साली पश्चिम बंगाल सरकरने संगीत महासन्मान पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याशवाय त्यांनी रवींद्र संगितप्रेमिंना मंत्रमुग्ध केले होते. सुमित्रा सेन यांच्या निधनानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक चाहते सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गांधी गोडसे : एक युद्ध’ सिनेमाचा टिझर प्रदर्शित, चित्रपटात पाहायला मिळणार थरारक वैचारिक युद्ध
‘प्रभाससमोर ऋतिक रोशन काहीच नाही’, राजामौलींच्या वक्तव्यानंतर इंडस्ट्रीमध्ये खळबळ